spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘लहान मुलाची समजूत फडणवीस काढतील’ केसरकरांच्या वक्तव्यावर निलेश राणेंचे प्रत्युत्तर

भाजपाचे नेते निलेश आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यातील आता नवीन वाद समोर आला.

मुंबई : एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांनी एकत्र येऊन नवे राज्य सरकार स्थापन केल्यानंतर शिंदे गट आणि भाजपात आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचे समोर आले आहे. भाजपाचे नेते निलेश आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यातील आता नवीन वाद समोर आला आहे.

 दीपक केसरकर यांनी राहण्याची दोन्ही मुलं लहान आहेत त्यांना समज देण्याची गरज असल्याचे म्हटले होते. यावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून एक व्हिडिओ ट्विट करत त्यांना चांगलाच समज दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले “दीपक केसरकर 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरू नका तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की दीपक केसरकर इज्जत मिळते ती घ्यायला शिका लायकी पेक्षा जास्त बोलू नका आणि लिमिटमध्ये रहा’. असे लिहीत केसरकरांना टोला लगावला आहे.

हेही वाचा : 

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी बातमी, यात्री ॲपद्वारे लोकल ट्रेनचे थेट लोकेशन ट्रॅक करू शकतात

यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली की “नारायण राणेंची मुलं लहान आहेत आणि त्यांना समजावण्याचे काम देवेंद्र फडणवीस करतील त्यांनी केलेले ट्विट मी पाहतही नाही आणि वाचतही नाही. लहान लहान मुलं ट्विट करत राहतात लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात कोणी गांभीर्याने त्यांच्याकडे पाहत नाही”. असे दीपक केसरकर यांनी म्हटले.

श्रीलंकेची तीन वर्षापूर्वी जी स्थिती होती तीच स्थिती आज भारताची : अतुल लोंढेंचा आरोप

Latest Posts

Don't Miss