spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Nilesh Rane : विनायक राऊतांच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर म्हणाले, औकातीत राहावं अन्यथा ठाकरेंची इज्जत,अब्रू…

खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपा प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विनायक राऊत यांच्यामध्ये जर खरी हिम्मत असेल तर त्यांनी सांगावं, की कलानगरला राहणाऱ्या एका सम्राटाने घरातीलच कोंबडी कशी चोरली हे एकदा महाराष्ट्राला कळू दे, असा टोला निलेश राणे यांनी लगावला. तो सम्राट कोण आहे, त्या बंगल्यात काय काय व्हायचं हे एकदा विनायक राऊत यांनी सांगावं, असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

राशी भविष्य ३०सप्टेंबर २०२२, तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा

शिवसेना नेते विनायक राऊत यांनी नेमकं काय म्हटलं?

विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी नारायण राणे यांचा उल्लेख कोंबडीचोर असा केला आहे. शिवसेना जेव्हा स्थापन झाली तेव्हा उद्धव ठाकरे हे सहा वर्षांचे होते, तर नारायण राणे हे चेंबूरच्या नाक्यावर कोंबडी कापत हेते. हा या दोघांमधील फरक आहे. असं म्हणतात तिथे असलेल्या टॉकिजमध्ये तिकीट ब्लॅक करणं, कोंबड्यांच्या माना कापणं, म्हणून त्यांचं नाव कोबंडीचोर पडलं अशी घणाघाती टीका राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे.

हिवाळ्यात रताळी खाणे ठरते शरीरासाठी फायदेशीर

टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर

तो सम्राट कोण आहे, त्या बंगल्यात काय काय व्हायचं हे एकदा विनायक राऊत यांनी सांगावं, जर विनायक राऊत बोलले नाहीत तर एक ना एक दिवस आम्ही महाराष्ट्राला सांगणार की कलानगरच्या सम्राटाने घरातलीच कोंबडी कशी चोरली, हे सांगायची आता वेळ आलीय आहे, असा इशारा निलेश राणे यांनी दिलाय. विनायक राऊत यांनी औकातीत राहावं, नाहीतर या ठाकरेंची इज्जत, अब्रू रस्त्यावर आणण्यासाठी कारणीभूत विनायक राऊतच असतील, असा टोलाही निलेश राणे यांनी लगावला.

नितळ त्वचेसाठी बनवा फुलांचा फेस पॅक

Latest Posts

Don't Miss