Nirmala Sitharaman: निर्मला सीतारमण पवारांच्या बालेकिल्ल्यात

Nirmala Sitharaman: निर्मला सीतारमण पवारांच्या बालेकिल्ल्यात

महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर अनेक भाजपचे बडे नेते महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर आत अर्थमंत्री निर्मला सीतारमण पुढील 3 दिवस बारामतीच्या दौऱ्यावर आल्या आहेत. भाजपकडून राष्ट्रवादीचा बालेकिल्या असलेल्या बारामतीत जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. या दौऱ्यापूर्वी, सीतारमण यांनी त्यांचा मुक्काम खडवासल्याचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या धनकवडीतील घरी केला. यावेळी त्यांनी रात्रीच्या जेवणात पोळी-भाजी आणि दही-भाताचा अस्वाद घेतला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नियोजित बारामती दौऱ्यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आठवडाभरापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एक विधान केलं होतं. “केंद्रीय मंत्री येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. निर्मला सीतारामन येतील. जनतेशी संवाद साधतील. बारामती, पुरंदर, शिरूरमध्ये येऊन त्या आपले विचार सांगतील. त्या सगळ्या भागातल्या जनतेला त्यांचे विचार, त्यांची भाषा सहजपणे समजेल”, असं पवार म्हणाले होते. मात्र आपल्या पुणे आणि बारामती दौऱ्यातील पहिल्याच दिवशी निर्मला सीतारामन यांनी पुणेकरांना थेट मराठीमध्ये भाषणाची सुरुवात करत बुधवारी आश्चर्याचा धक्का दिला.

नेहमी इंग्रजीमधून भाषण करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये आपल्या भाषणाची सुरूवात इंग्रजीमधून न करता थेट मराठी भषेतून केली. “सगळ्या पुणेकर बंधू भगीनींना माझा नमस्कार, तुम्ही सगळे कसे आहात?” असं म्हणत अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणाला त्यांनी सुरूवात केली. निर्मला सीतारामन यांनी मराठीमध्ये भाषणाला सुरुवात केल्यानंतर सभागृहामध्ये उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून त्यांच्या या प्रयत्नांना दाद दिल्याचं पहायला मिळालं.

शरद पवारांचा बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपकडून कसोसीने प्रयत्न केले जात आहेत. भाजपने मिशन बारामतीची सुरुवात केली असून, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत हा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. १९९६ पासून बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांचे निर्विवाद वर्चस्व आहे. १९८४ आणि १९९१ ला देखील पवारांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. उत्तर प्रदेशातील अमेठीत मिळालेल्या विजयानंतर आता भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघाकडे आपला मोर्चा वळवला आहे. यासाठी आमदार राम शिंदेंनी कंबर कसली आहे.

हे ही वाचा:

Blue Aadhaar Card : ब्लू आधार कार्ड म्हणजे काय ? आणि ते कसे बनवायचे …?

PFIच्या कार्यालयावर NIAची छापेमारी सुरूच : तब्बल 20 संशयित ताब्यात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version