spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रत्नागिरीत शरिया कायदा लागू झाला आहे का? Nitesh Rane यांचा प्रशासनाला सवाल

रत्नागिरी जिल्हायातील अनधिकृत बांधकामांमुळे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) पुन्हा आक्रमक झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीतील हिंदू समाज अस्वस्थ झाला असून लांगूलचालनचे विषय मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत असे वक्तव्य त्यांनी केले असून रत्नागिरीत शरिया कायदा लागू झाला आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आज (शनिवार, ३१ ऑगस्ट) रत्नागिरीत माध्यमांशी संवाद साधत त्यांनी हे व्यक्तव्य केले. त्यामुळे, पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

नितेश राणे यावेळी म्हणाले, “रत्नागिरीतील हिंदू समाज अस्वस्थ आहे. रत्नागिरीमध्ये लांगूलचालनचे विषय मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अनधिकृत बांधकामं वाढली आहेत, ज्याला मजारचं स्वरूप दिलेलं आहे. मोहम्मद पैगंबरच्या शिकवणीमध्ये मजार विषयाला परवानगी आहे का? हे मुस्लिम समाजाला मला विचारायचं आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना काढण्यात काय अडचण आहे. हिंदू समाजाने रत्नागिरीत कुठल्याही शासकीय जमिनीवर साधी टपरी बांधली तरी ती दोन तासांत हटविली जाते. प्रशासन जो नियम हिंदू समाजाला लावतं तोच नियम मुस्लिम समाजाला लावला पाहिजे. रत्नागिरीत शरय्या कायदा लागू झाला आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ते पुढे म्हणाले, “याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली. आता तारखेच्या अनुसार हे अनधिकृत बांधकाम निघालं नाही तर रत्नागिरीतील हिंदू समाज रस्त्यावर उतरून आक्रमक झाला, कायदा -सुव्यवस्था बिघडली तर त्याला पूर्ण जबाबदार इथलं प्रशासन राहील. इथे गोमांस विकणारे, कत्तलखाने चालवणारे आहेत त्यांची नावं एसपी आणि प्रशासनाकडे दिली आहेत, त्याच्यावर कारवाई होते का पाहू. प्रशासनाने जर यापुढे आम्हाला परत परत याच पद्धतीची उत्तरं दिली, तर असे हिंदू समाजाला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना आमचं सरकार किती काळ त्या खुर्चीवर ठेवतं हे आमच्या वरिष्ठांशी चर्चा करू आणि त्याबद्दल निर्णय घेऊ. पोलीस प्रशासनातही काही सडके आंबे आहेत ते या लोकांना मदत करताहेत. अशा सडक्या आंब्यांमुळे आमच्या देवेंद्र फडणवीस यांचं नाव आम्ही खराब होऊ देणार नाही,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss