“आदित्य ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा”

“आदित्य ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा”

हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून अवघे तीन दिवस झाले असतानाच वेगवेगळ्या मुद्यांनी ते गाजत आहे. काल (२१ डिसेंबर) शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत आणि त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचे प्रकरण प्रचंड तापले आहे. रिया चक्रवर्तीला जे कॉल आले ते ‘AU’ नावाने होते असं शेवाळे त्यांनी म्हटलं आहे. यावरून आता राजकारण चांगलच तापलं असून, अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत, आता या वादात भाजप नेते नितेश राणे यांनी देखील उडी घेतली असून, त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात फक्त आदित्य ठाकरे यांचंच नाव का घेतलं जात आहे? इतर राजकीय नेत्यांची नावं का घेतली जात नाहीत असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. तसेच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची नार्को टेस्ट (Narco test) करा म्हणजे सत्य बाहेर येईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : 

Rashami Desai ‘बिग बॉस फेम’ रश्मीने दाखवला ब्लॅक रंगाच्या आऊटफिट नवा अंदाज

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, जसे श्रद्धा वालेकरच्या केसमध्ये आफताबची नार्कोटेस्ट झाली आणि सत्य बाहेर पडले. तसेच, आदित्य ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा. म्हणजे A फॉर आफताब A फॉर आदित्य सगळ्या विकृतींची नावं एकसारखीच झाली आहेत. त्यामुळे एकदा नार्कोटेस्ट करा म्हणजे सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणाचं सत्य बाहेर येईल. असे त्यांनी म्हटले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येच्या प्रकरणात, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतले आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राहुल शेवाळी काय म्हणाले, दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ वेळा फोन आले. ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा होतो, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केला आहे. शेवाळे यांच्या आरोपानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.

Winter Solstice वर्षातला सर्वात लहान दिवस, जाणून घेऊया काय आहे या मागच भाैगाेलिक कारण?

आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

“गद्दारी करणाऱ्यांकडून चांगलं काही अपेक्षित नाही. मला त्या घाणीत जायचं नाही. शेवाळेंचं लग्न ठाकरेंनी कसं वाचवलं मला माहित असल्याची टीका देखील आदित्य ठाकरे यांनी राहुल शेवाळे यांच्यावर केली आहे. राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवरुन लक्ष हटवण्यासाठी असे आरोप केले जात असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. सभागृहात आम्हाला बोलू दिलं जात नाहीये. राज्यातील प्रश्न बाजुला राहिलेत. राज्यपालांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.

हे सरकार भ्रष्ट मार्गानं सत्तेत आलं असून, भ्रष्टाचाराच्या ओझ्यानच पडेल, राऊतांच्या हल्लाबोल

Exit mobile version