भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांची पत्रकार परिषद आज (मंगळवार, २५ जून) पार पडली. यावेळी त्यांनी शिवसेना उबाठा (Shivsena UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली. बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपची नवनिर्वाचित खासदार कंगणा रनौत (Kangana Ranaut) यांनी महाराष्ट्र सदनमध्ये (Maharashtra Sadan) मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान राहण्यास मागितल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर, आता नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत, “कंगना रानौत यांनी महाराष्ट्र सदनमध्ये जाऊन राहण्यासाठी विचारपूस केली. यावर संजय राऊतला मिरच्या झोंबल्या. त्या निवडून गेलेल्या खासदार आहेत तुमच्या सारख्या बॅकडोअर आलेल्या नाहीत,” अश्या शब्दांत टीका केली आहे.
नितेश राणे म्हणाले, “काल कंगना रानौत यांनी महाराष्ट्र सदनमध्ये जाऊन राहण्यासाठी विचारपूस केली. त्यांना प्रशासनाने नाही म्हटले आणि त्या तेथून निघून गेल्या. यावर संजय राऊतला मिरच्या झोंबल्या. त्या निवडून गेलेल्या खासदार आहेत. तुमच्या सारख्या बॅकडोअर आलेल्या नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर सचिन वाझे तिकडे किती दिवस राहायचा? त्याचे उत्तर कधी देणार? संजय राऊत हे महाशय ज्या निवासस्थानी राहतात तिथे बॉलीवूडची कलाकार किती दिवस राहिली ह्याची माहिती द्यायची का ?”
पुण्यातील ड्रग्स प्रकरणावर (Pune Drugs Case) संजय राऊत यांनी भाष्य करत भाजपावर आरोप केले होते. त्यावर प्रतिक्रिया देत निलेश राणे म्हणाले, “गजनी झालेल्या राऊतला माहित नाही अडीच वर्षे मविआची सत्ता होती. तुमचे मालक मुख्यमंत्री होते तेव्हा ड्रग्स थांबले का नाहीत ? तुम्ही काय प्रयत्न केले तुमचे गृहमंत्री जेल मध्ये होते? उडता मातोश्री बाबत चिंता करा. तुझ्या मालकाचा मुलगा ड्रग्स वाल्या लोकांसोबत का असतो? रिझवी कॉलेजच्या मागे कोण भेटायचे? अंमली पदार्थाचे धागेदोरे मातोश्री वरून मिळतील, कुंपण शेत खात आहे. तुमच्या सारखी सवय दुसऱ्यांना नाही. तुमच्या दिल्लीच्या बंगल्यावर कोण अभिनेत्री येते याची माहिती जनतेला मिळावी.”
संजय राऊत यांनी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार ऍड उज्ज्वल निकम (Adv Ujjwal Nikam) यांच्यावरदेखील निशाणा साधला होता. त्यावर उत्तर देत निलेश राणे म्हणाले, “उज्ज्वल निकम यांनी कसाबला फाशी देण्यास मदत केली, मात्र असंख्य गुन्हेगारांची बाजू घेणारे मेंनन वकील तुमच्या शरद पवारांच्या बाजूला बसतात. गुजरात मोठं केंद्र आहे कि मातोश्री तिसरा मजला केंद्र आहे ह्याची चौकशी केली पाहिजे. उडता पंजाब नंतर उडता मातोश्री चित्रपट काढायचं का ? अडीच वर्ष तुमची सत्ता होती त्या अडीज वर्षाचा हिशोब केला पाहिजे त्यावेळी पुण्यात ड्रग्स थांबविण्यासाठी काय काय प्रयत्न केले? संजय राऊतने ड्रग्स ह्या विषयावर बोलून मालकाच्या मुलाला अडचणीत आणू नये हा मैत्रीचा सल्ला आहे. आमचे गृहमंत्री सक्षम आहेत तुमच्या वसुली सरकार पेक्षा आमचे सरकार सक्षम आहे वेळ आली तर चौकात फाशी देऊ,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा
Ujjwal Nikam यांना BJP ने Loksabha Election साठी फासावर लटकवण्याचं काम केलं: Sanjay Raut
Follow Us