Saturday, July 6, 2024

Latest Posts

Pune Car Accident: नेहमी Devendra Fadnavis यांचा राजीनामा मागणाऱ्या Supriya Sule आता गप्प का? Nitesh Rane यांचा सवाल

भाजप आमदारा नितेश राणे यांनी आज (गुरुवार, २३ मे) पत्रकार परिषद घेत अनेक पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पुणे अपघात प्रकरणावर प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले.

पुणे अपघातप्रकरणाचा (Pune Car Accident) विषय सध्या देशभरात चर्चेत आहे. यावरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. गुन्ह्यातील मुख्य अल्पवयीन आरोपीला जामीन नाकारून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तसेच त्याचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यालादेखील तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अश्यातच आता यावरून राजकारणही रंगू लागले आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फ़ैरी झाडत आहेत. भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘नेहमी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे या आता गप्प का आहेत?’

भाजप आमदारा नितेश राणे यांनी आज (गुरुवार, २३ मे) पत्रकार परिषद घेत अनेक पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पुणे अपघात प्रकरणावर प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले.

नितेश राणे म्हणाले,”नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे आता का गप्प आहेत? शरद पवार गटाकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया का व्यक्त होत नाही? प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे का गप्प आहेत? अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध आहेत का? आरोपीचे वकील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आयुक्तालयात बसून अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्या मुलावर कडक कारवाई सुरु आहे. आता सुप्रियाताई गप्प का आहेत ते त्यांनी सांगावे. त्यातून खूप रहस्य बाहेर येतील,” असे ते म्हणाले.

पुण्यातील अपघातानंतर विरोधकांनी राज्य सरकारला घेरलं आहे. विरोधकांकडून पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP) आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare) यांना लक्ष केले जात आहे. पुण्याचे खासदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यावरून अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.

 
 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss