Saturday, July 6, 2024

Latest Posts

पाकिस्तान हृदयसम्राट मिया Uddhav Thackeray, शिवसेना वर्धापनदिनी Nitesh Rane यांचे टीकास्त्र

भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची आज (बुधवार, १९ जून) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी शिवसेना उबाठा गटावर (Shivsena UBT) जोरदार निशाणा साधला.

भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची आज (बुधवार, १९ जून) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी शिवसेना उबाठा गटावर (Shivsena UBT) जोरदार निशाणा साधला. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त (Shivsena Foundation Day) टीका करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचा ‘पाक सेना’ असा उल्लेख केला. यावेळी बोलताना ‘उद्धव ठाकरे हे पाकिस्तान हृदय सम्राट मिया उद्धव ठाकरे आहेत,’ असे वक्तव्य त्यांनी केले.

यावेळी पत्रकार परिषदेत नितेश राणे म्हणाले, “आज शिवसेनेचा वर्धापन दिन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बाळासाहेबांनी सुरु केलेला पक्ष ह्या साठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांना व त्यांच्या शिवसैनिकांना शुभेच्छा देतो. पाकिस्तान मध्ये ज्या सेनेचा गावगवा होतोय त्या मिया उद्धव च्या पाक सेनेचा देखील वर्धापन दिन आज साजरा होतो आहे. या पाक सेनेमुळे जागोजागी हिरवे झेंडे वं पाकिस्थान जिंदाबाद चे नारे ऐकायला आले. पाकिस्तान हृदय सम्राट मिया उद्धव ठाकरे आहे. बाळाहेबांच्या काळात हिरवे झेंडे कुठे दिसायचे नाहीत मात्र आज मिया उद्धव मुळे जागोजागी हे झेंडे दिसत आहेत. पाकिस्तान हृदय सम्राट पाकिस्थानची किती लाल करतो हे ऐकायला आज तुफान गर्दी होईल. मिया उद्धव ठाकरेंचे विचार पाकिस्ताचे चाटणारे आहेत.”

पुढे ते म्हणले, “एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली नसतील तर बाळासाहेबांचे नाव पाक सेनेच्या बॅनर वर कधीही दिसले नसते. मिश्किल टोला किती मारुदे मैदान लांब नाही फडणवीस साहेबांनी जे बोलून दाखवलं आहे ते सत्य करण्यासाठी आम्ही तयारी केले आहे तुमची हिंमत असेल तर स्वतःच्या ताकदीवर 10 आमदार निवडून आणा. उबाठा नावाच्या डुबत्या जाहजात कोण जाईल भुजबळ साहेब एवढी मोठी चूक करतील असं वाटत नाही. प्रत्येक समाजाला आपला अधिकार मागण्याचा हक्क आहे. हिंदूंमध्ये फटाफूट होते त्याच फायदा इतरांना होतोय याचा विचार झाला पाहिजे. तुमचे उबाठा नावाचे इंजिन बंद होणार आहे हिरवं ऑइल टाकलं जातं आहे.”

नाना पटोले (Nana Patole) यांच्या काँग्रेस कार्यकर्त्याला पाय धुवायला लावण्याच्या कृत्यावर टीका करत नितेश राणे म्हणाले, “ह्यालाच काँग्रेस ची संस्कृती म्हणतात उद्या अंघोळ घालायला लावतील. आम्ही पण काँग्रेस मध्ये असताना बरंच काही बघितलेले आहे. केव्हा तरी महाराष्ट्राला सांगावे लागेल. हॉटेल मध्ये ह्यांचे नेते काय काय करतात ह्याचे व्हिडिओ बाहेर आले तर तोंड दाखवायला जगा उरणार नाही. स्मारकच्या परवानग्या फडणवीसांनी दिल्या आहेत. उद्धव ठाकरे टिपू सुलतानच स्मारक बांधेल.”

हे ही वाचा

BJP च्या चाणक्याला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही, Rohit Pawar यांचे Devendra Fadnavis यांना खडेबोल

Kokan Graduate Constituency: पैशाच्या जोरावर विकत घेऊ पाहणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss