नितेश राणेंचा मोठा दावा, वास्तव समोर आल्यावर सुप्रियाताई…

नितेश राणेंचा मोठा दावा, वास्तव समोर आल्यावर सुप्रियाताई…

अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लव्ह जिहाद वर भाष्य केल होत. त्यावेळेस सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की “लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच, लव्ह जिहाद हा खूप गंभीर विषय असून गेल्या काही दिवसांपासून मी फार मनमोकळेपणाने बोलत आहे. लव्ह जिहादचा अर्थ असेल तर मी कुणाशीही चर्चा करायला तयार आहे” असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी दिल होतं. आता, हे आव्हान भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी स्विकारलं असून ते यावर सविस्तर चर्चा करायला तयार आहेत, असे नितेश राणे यांनी सांगितले आहे.

सध्या महाराष्ट्रामध्ये हिंदू संघटना आणि भाजपच्या नेत्यांकडून लव्ह जिहादच्या विरोधात मोर्चे काढण्यात येत आहेत. तर काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये देखील भाजपच्या नेत्यांनी आणि हिंदू संघटनांनी लव्ह जिहादच्या विरोधात मोर्चा काढला होता. तर आता या विषयावर सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलं होता की “लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही, लव्ह जिहाद हा खूप गंभीर विषय असून गेल्या काही दिवसांपासून मी फार मनमोकळेपणाने बोलत आहे. लव्ह जिहादचा अर्थ असेल तर मी कुणाशीही चर्चा करायला तयार आहे” असे सुप्रिया सुळे यांनी सांगितल होत. तर आता नितेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर सांगितल की “खासदार सुप्रिया सुळे यांनीच वेळ व तारीख ठरवावी, मी सविस्तर चर्चा करायला तयार आहे” असे नितेश राणे यांनी जाहीर पणे सांगितल आहे. त्याच बरोबर नितेश राणे यांनी पुढे सांगितलं की “हिंदू मुलींना कसं फसवलं जात, त्यांच आयुष्य कस बर्बाद केल जात हे मी दाखवून देईन, त्या मुलींना प्रत्यक्ष भेट घालूनही देईन” असे नितेश राणे म्हणाले आहेत.

नितेश राणे यांनी पुढे सांगितलं की “लग्नाआधी जो मुलगा अमर असतो तो लग्नानंतर आमीर होऊन जातो. लग्नानंतर हिंदू भगिनीला नाव बदलायला सांगत इस्लाम स्विकारायला सांगितलं जातं. मुलीनं ते ऐकलं नाही तर पेट मारूनही टाकण्यात येत. वास्तव समोर आल्यावर सुप्रियाताई ह्याही आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतील. वेळ अणि तारीख ठरवा, मी तुमच्या ज्ञानात भर टाकणार” असा दावा करत नितेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांना टोलाही लगावला आहे.

हे ही वाचा : 

आज लता दीदींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आयुष्यातील आठवणींच्या क्षणांचा परिचय घ्या जाणून

Kasba By Poll Election, पोट निवडणुकीच्या रॅलीत गैरहजर राहून टिळक कुटुंबीयांनीची भाजपवर दर्शवली नाराजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version