spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

माझ्याही वडिलांना मारण्याची सुपारी दिली होती, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर गभीर आरोप

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदेना झेड प्लस सुरक्षा देण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाकारल्याचा दावा शिवसेनेतले बंडखोर आमदार सुहास कांदेंनी त्यांच्या संवादयात्रेतून मनमाड येथे केला. तेव्हापासून हे प्रकरण चांगलेच पेटले आहे. त्यावरुन आता नितेश राणेंनीही एक ट्वीट केले आहे. आपण व्याजासकट वस्त्रहरण करु असे आवहान त्यांनी या ट्विटच्या माधमातून केले.

आपल्या ट्वीटमध्ये नितेश राणे म्हणतात, “माझ्या वडिलांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा एकनाथ शिंदेप्रमाणेच त्यांनाही मारण्यासाठी तथाकथित शांत आणि संयत पक्षप्रमुखांकडून काही सुपाऱ्या देण्यात आल्या. हे ‘म्याव म्याव’ संपवून टाकूया त्यानंतर आपण व्याजासह वस्त्रहरण सुरू करू”. असे नितेश राणे यांनी म्हटले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती. शिंदे यांनी गडचिरोली भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली होती. यावेळी नक्षलवाद्यांकडून शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गुप्तचर यंत्रणांनी तसा अहवालही दिला होता. त्यामुळे गृहविभागाने शिंदेंना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय़ घेतला होता. परंतु माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या आदेश नुसार गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंना फोन करुन झेड प्लस सुरक्षा देण्यास मनाई केली, असा आरोप शिवसेनेतले बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

मागील महिन्यात शिवसेनेते मोठी फूट पडली आहे. अशातच दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच भाजपच्या काही नेत्यांकडूनही शिवसेनेवर टीका केली जात आहे. यातच नितेश राणे यांच्याकडून एक ट्वीट करण्यात आलं आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या मुद्यावरुन राजकारण तापलं असतानाच नितेश राणे यांनी हे नवीन ट्वीट केलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आयोध्या दौरा लवकर

Latest Posts

Don't Miss