‘गौरी भिडेंना पोलीस संरक्षण द्या, अन्यथा त्यांचा पण सुशांत सिंग राजपूत’ नितेश राणेंचे खळबळजनक ट्विट

‘गौरी भिडेंना पोलीस संरक्षण द्या, अन्यथा त्यांचा पण सुशांत सिंग राजपूत’ नितेश राणेंचे खळबळजनक ट्विट

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बेहिशेबा मालमत्ता जमवल्याचा आरोप करत हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. दादरमधील रहिवासी गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी ही याचिका दाखल केली असून न्यायमूर्ती एस. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठापुढे काल यावर सुनावणी झाली. ठाकरेंचं उत्पन्न आणि त्यांची संपत्ती याचा ताळमेळ लागत नसल्यानं याप्रकरणाची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.

हेह वाचा : 

मुंबईत भास्कर जाधव यांच्याविरोधात भाजपचे बॅनर; ‘शोधून आणणाऱ्यास ११ रुपयांचे बक्षीस…!”

मुंबई पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई झाली नाही. त्यामुळे याचिका केल्याचा दावा गौरी भिडे यांनी केला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, सीबीआय, ईडीसह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे यांनाही याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. असे असताना आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी गौरी भिडेंबद्दल एक ट्वीट केलं आहे. ज्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

“गौरी भिडे हिच्या जिवाचे रक्षण व्हावे, महाराष्ट्र राज्य शासानाने तिला त्वरित पोलीस संरक्षण द्यावे. दिशा सालियान, सुशांत सिंग राजपूत आणि मनसुख हिरेन यांचे काय झाले ते आम्हाला माहीत आहे. ” असं आमदार नितेश राणेंनी ट्वीटमध्ये म्हटल आहे.

MCA Election : दिग्गज राजकारणी एकाच मंचावर ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

गेल्या सात- आठ वर्षांपासून “ना खाऊंगा ना खाने दूंगा” तसेच “और जो आज तक खाया वो भी उगलवा लुंगा” या ब्रीदवाक्याने आपण खरोखरच प्रेरित आहोत. त्यामुळे या देशाचा एक प्रामाणिक आणि जागरुक नागरिक म्हणून, आपण केंद्र सरकारला आणखी काही लपविलेल्या, उत्पन्नाच्या तुलनेत बेहिशेबी संपत्ती शोधून काढण्यासाठी काही प्रमाणात मदत करण्याचा विचार केला आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या माध्यमातून जमवलेले पैसेही उघडकीस आणण्याचे ठरवले आहे, असा दावाही याचिकाकर्तीने केला आहे.

 

कोण आहेत गौरी भिडे?

सामना आणि मार्मिक प्रकाशित करणारा ठाकरे कुटुंबियांच्या मालकीचा ‘प्रबोधन’ प्रकाशनचा छापखाना जिथे आहे, त्याच्या शेजारीच गौरी भिडे यांच्या आजोबांचा ‘राजमुद्रा’ प्रकाशन हा छापखाना होता. केवळ सामना आणि मार्मिकच्या विक्रीतून एवढी अफाट संपत्ती गोळा होणं, मातोश्री 2 सारखी टोलेजंग इमारती उभी करणं, आलिशान गाड्या, फार्महाऊसेस घेणं निव्वळ अशक्य आहे. कारण आपलाही हाच व्यवसाय, तेवढेच परिश्रम असल्यानं मिळकतीत जमीन अस्मानाचा फरक कसा? असा सवालही या याचिकेतून उपस्थित करण्यात आला आहे.

हे ही वाचा: 

मुंबईत भास्कर जाधव यांच्याविरोधात भाजपचे बॅनर; ‘शोधून आणणाऱ्यास ११ रुपयांचे बक्षीस…!”

 

Exit mobile version