नितीन देशमुख निघाले ACB कार्यालयाकडे, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

नितीन देशमुख निघाले ACB कार्यालयाकडे, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होत असल्याचं दिसून येत. अनेक नेत्यांची कुठल्या ना कुठल्या बाबतीत चौकशी सुरु असल्याचं दिसून येत आहे. तर आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हे आज अमरावतीच्या एसीबीच्या विभागीय कार्यालयात (Divisional Offices of ACB at Amravati)चौकशीसाठी हजर होणार आहे. पण यावेळी देशमुख चौकशीनिमित्ताने मोठं शक्तीप्रदर्शन करुन रवाना झाले.

आमदार नितीन देशमुख यांच्या आजच्या चौकशीनिमित्त ठाकरे गटाकडून मोठं शक्तिप्रदर्शन होण्याची सुद्धा शक्यता आहे. नितीन देशमुख आज सकाळी दहाच्या सुमारास अकोल्यातील त्यांच्या कार्यालयातून अमरावतीकडे (Amravati) प्रयाण करणार आहेत. अकोल्यातून जवळपास ७०० कार्यकर्ते देशमुखांसोबत अमरावती इथे जाण्याची शक्यता आहे.

आज अशी मानसिकता निर्माण केली की, अमरावतीचे एसीबी कार्यालयात हजर झाल्यानंतर आपल्याला अटक करतील, त्यानंतत आत टाकतील त्या हिशोबाने तयारीलाच लागलो, म्हणून आज घरून कपडे (clothes) घेऊन सोबत चाललोय. कारण की, हुकूमशाहीच्या पद्धतीने सरकार चालू आहे, इंग्रजापेक्षा हे खराब लोक आहेत, असा आरोप देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. चौकशीचं शुक्लकाष्ठ मागे लागलेलं असतानाही आमदार नितीन देशमुख यांच्या दिनचर्येवर (routine) कोणताही परिणाम झालेला नाही. ते दररोजप्रमाणे आजही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात वॉकसाठी गेले होते. त्यांनी आपला रोजचा व्यायामही केला. शिंदे सरकारच्या चौकशा आणि कारवाईने अजिबात डगमगणार नसल्याचं आमदार देशमुख म्हणाले.

हे ही वाचा:

संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानचे अब्दुल रहमान मक्की यांना जागतिक दहशतवादी म्हणून केले घोषित

अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या अडचणीत वाढ, तहसीलदारांने बजावली ‘या’ प्रकरणात थेट नोटीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version