spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Nitin Gadkari on Prime Ministership: विरोधी पक्षामधील एका बड्या नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण….

Nitin Gadkari on Prime Ministership: लोकसभा निवडणुकीआधी मला पंतप्रधान पदाची ऑफर देण्यात आली होती, असं मोठं विधान रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले आहे. विरोधी पक्षामधील एका बड्या नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. मात्र, मी ती नाकारली कारण मला कोणत्याही पदाचा मोह नाही. नागपूर येथील पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात नितीन गडकरी यांनी हे विधान केले आहे. नागपूर येथे रंगलेल्या या कार्यक्रमात नितीन गडकरी यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे. यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते पत्रकारिता पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की, मला कुणाचे नाव घ्यायचे नाही, पण मला अशी ऑफर देण्यात आली होती. तुम्ही जर पंतप्रधान होणार असाल तर तुम्हाला आमचं समर्थन असेल मी त्यांना विचारलं होतं की, तुम्ही मला पाठिंबा का देत आहात आणि मी तुमचं समर्थन का घेऊ? त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, पंतप्रधान होण आहे माझं ध्येय कधीच नव्हतं. मी पूर्णपणे झोपून देऊन माझं काम करत आहे. माझ्या कामावर माझी श्रद्धा आहे. मी त्यावेळी त्या नेत्याला म्हटलं की मी माझ्या विचारधारेशी प्रामाणिक आहे. मी माझ्या पक्षासोबत प्रामाणिक आहे. माझ्या पक्षाने मला सर्व काही दिलं आहे. त्यापैकी कोणत्या गोष्टीचा मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. म्हणून, असा कोणताही प्रस्ताव माझ्याकडे जर आला तर मी त्याला बळी पडत नाही. मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही, कारण मी माझ्या विचारधारेवर चालत असतो.

आता फास्टॅग नाही, तर सॅटेलाईट आधारीत टोल सिस्टिम होणार सुरू

फास्टॅग (Fastag) असले तरी अनेक टोल नाक्यांवर लांबच्या-लांब रांगा पाहायला मिळतात. परंतु पूर्वीपेक्षा प्रमाण थोडे कमीच म्हटले तरी चालेल. फास्टॅगमुळे या टोल वसुलीला वेग मिळाला आहे. मात्र आता टोल नाक्यांवर मोठी रांग लावत राहण्याची गरज भासणार नाही. आता तुमचे वाहन तुम्ही अतिशय वेगाने पुढे नेलात तरीही तुमच्या बँक खात्यातून टोल वसूल करण्यात येणार आहे. आता सॅटेलाईट (Satellite) आधारित टोल सिस्टिम सुरू होणार आहे. त्यामुळे फास्टॅग स्कॅन करण्याची गरज भासणार नाही. सॅटेलाईटच्या मदतीने कारची ओळख पट‍वण्यात येईल. त्यानंतर संबंधित कार चालकाच्या बँक खात्यातून टोल वसूल करण्यात येणार आहे.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss