spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज ठाकरेंच्या निशाण्यावर नितीन गडकरी, महाराष्ट्रात रस्ते बनवण्यात गडकरी अपयशी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या दोन दिवसांपासून पुणे दौऱ्यावर आहेत. आज राज ठाकरे पुण्यामधून संवाद साधत होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या दोन दिवसांपासून पुणे दौऱ्यावर आहेत. आज राज ठाकरे पुण्यामधून संवाद साधत होते. तेव्हा त्यांनी महाराष्ट्रामधील रस्ते आणि टोल नाके या मुद्द्यांवर परखड भाष्य केले आहे. राज्यामधील रस्त्यांची झालेली चाळण आणि ट्रॉफीच्या समस्येवर बोलताना राज ठाकरे यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यावर खोचक टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मला एक गोष्ट कळत नाही. केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री मराठी आहेत. महाराष्ट्रातील आहेत आणि महाराष्ट्रातील रस्ते खराब आहेत. या सारखं दुर्दैव नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे.

पुढे राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात रस्ते बनवण्यात नितीन गडकरी अपयशी झालेत. बांद्रा वरळी सी लिंक १० वर्ष जातात आणि रामायणात सेतू पूल बांधण्यात आला पण रस्ते होईना. मागच्या १७ वर्षांपासून मुंबई- गोवा रस्त्याचं काम सुरू आहे. एक रस्ता पूर्ण व्हायला १७ वर्षे लागतात? एक ठिकाणी तुम्ही रस्ता बनवता दुसऱ्या ठिकाणी बनवत नाही. मग हा बनवलेला रस्ता खराब होतो. हे किती दिवस चालणार? आम्ही भूमिका घेतल्यानंतर ६५ टोलनाके बंद झाले. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता… पण ज्यांनी टोल मुक्त महाराष्ट्र करू म्हणून सांगत होते. त्यांना तुम्ही प्रश्न विचारत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, तुमच्या सभांना गर्दी असते. परंतु त्याच रूपांतर मतांमध्ये होताना दिसत नाही असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला तेव्हा अटलबिहारी यांच्या पण भाषणाला गर्दी व्हायची. त्यांचं भाषण ऐकायला लोक यायचे. परंतु त्यांना १९९९ साली थोडं यश मिळालं. त्यांनतर आता २०१४ ला भाजपाची सत्ता आली. मला पण गर्दी होते इतर पक्षांना त्यांना पण विचारा कधी? असे की, तुमच्या सभेला गर्दी होते, असं राज ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा:

मोदींनी दिल्यात, ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या हातात तिजोरीच्या चाव्या , उद्धव ठाकरे

मनसेने दिले भाजपाला तोडीस तोड उत्तर | MNS | Amit Thackeray | Raj Thackeray |

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss