“एकनाथ शिंदे यांना अमृत पाजलंय, त्यांची गाडी आता प्रगतीच्या मार्गावरून सुसाट धावणार” : नितीन गडकरी

राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीला लागले आहेत.

“एकनाथ शिंदे यांना अमृत पाजलंय, त्यांची गाडी आता प्रगतीच्या मार्गावरून सुसाट धावणार” : नितीन गडकरी

"एकनाथ शिंदे यांना अमृत पाजलंय, त्यांची गाडी आता प्रगतीच्या मार्गावरून सुसाट धावणार" : नितीन गडकरी

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीला लागले आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते आता शिवसेना पक्ष वाढीसाठी राजकीय मैदानात उतरले आहेत. जुन्या सरकारच्या कार्यकाळात अपूर्ण राहिलेले काही प्रकल्प योजना आता शिंदे सरकार मार्गी लावणार आहे.

अशातच भाजपाचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात मोठे विधान केले. “आम्ही आता एकनाथ शिंदे जिल्हा असे अमृत पाजले आहे की, त्यांची गाडी आता बुलेट ट्रेन पेक्षा सुसाट धावणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही शिंदेंना सहकार्य करू. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य आता प्रगतीच्या मार्गावर धावणार आहे. याचा आम्हाला विश्वास आहे”. अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली.

हेही वाचा : 

राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

पुढे माध्यमांशी बोलताना गडकरी म्हणाले की, “देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचे योगदान खूप आहे देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात भर घालणार आहे. देशातच नाही तर जगात राज्य खूप पुढे जाईल याचा मला विश्वास आहे. आम्ही भविष्यात दिल्ली ते मुंबई हायवे बनवणार आहोत. जसे नवी मुंबईला एका शहराचे स्वरूप दिले आहे तसेच पुणे आणि औरंगाबादला एका स्मार्ट सिटीचे स्वरूप देऊ”.

केंद्र सरकारकडून नागरिकांना दिलासा, खाद्यतेलाच्या किंमतीत 15 रुपयांनी घसरण

Exit mobile version