रस्ता पूर्ण न करताच नितीन गडकरी करणार लोकार्पण, मविआचा आरोप

या महामार्गाचे लोकार्पण होण्याआधीच हा वादाचा विषय ठरला आहे. महामार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच लोकार्पण करण्यात येत आहे, असा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.

रस्ता पूर्ण न करताच नितीन गडकरी करणार लोकार्पण, मविआचा आरोप

केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते आज बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा लोकार्पण सोहळा मलकापूर येथे पार पडणार आहे. पण या महामार्गाचे लोकार्पण होण्याआधीच हा वादाचा विषय ठरला आहे. महामार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच लोकार्पण करण्यात येत आहे, असा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. दरम्यान यावेळी ४५ किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण तर झाले आहे. तसेच या महामार्गावर अनेक पुलांचे अजूनही पूर्ण झालेले नाही. मग हा लोकार्पण सोहळा कसा? असा सवालही महाविकास आघाडीने यावेळी विचारला आहे.

‘बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या हा मुबंई-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे ८०० कोटी रुपये खर्च करून ४५ किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. पण या महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झाले नाही. अशातच हा महामार्ग वाहतूकीसाठी खूला केल्यास तिथे अपघात होण्य़ाची शक्यता टाळता येत नाही. एखादा अपघात झाला तर तिथे कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. तसेच या महामार्गावर अजूनही स्ट्रीट लाईट सुरु करण्यात आले नाही. या महामार्गावरील अनेक पुलांचे काम अपूर्ण आहे. महामार्गाचे काम अपूर्ण असले तरीही ईथे टोल सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे टोल ठेकेदाराच्या भल्यासाठी हा लोकार्पण सोहळा होत आहे.’ असे आरोप महाविकास आघाडी करून करण्यात येत आहेत.

तसेच नितीन गडकरी यांची कंत्राटदार आणि स्थानिक नेत्यांकडून दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे या मुबंई-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम खरंच पूर्ण झाले आहे का याची नितीन गडकरी यांनी चौकशी करावी अशी विनंतीसुध्दा महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे.

हे ही वाचा: 

शरद पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार गटाची बीडमध्ये उत्तर सभा?

देवेंद्र फडणवीसांनी दिला उद्धव ठाकरेंना टोला

अमित शहांचा मोठा प्लॅन, यूपी, बिहार, गुजरात आणि महाराष्ट्रातील…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version