राज्यपालांच्या वक्तव्यानंतर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया

राज्यपालांच्या वक्तव्यानंतर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त विधानांनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. यादरम्यान कोश्यारींच्या विधानानंतर भाजपचे नेते नितीन गडकरी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर विधानानंतर गडकरींच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री असलेल्या गडकरींच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन एक व्हिडीओ क्लीप शेअर करण्यात आली आहे. यामध्ये गडकरी म्हणाले आहेत की, आई वडिलांपेक्षा आमची शिवरायांवर निष्ठा असल्याचे गडकरी म्हणाले आहेत. गडकरी म्हणाले की, “शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत, आमच्या आई वडिलांपेक्षादेखील छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचं जीवन आमचा आदर्श आहे.”

तुमचे आवडते हिरो- आदर्श कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर देताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यासाठी बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असं विधान केलं होतं. या विधानावरून नवा वाद निर्माण झाला. यानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गटाने या विधानाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यादरम्यान आता गडकरींनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : 

Bigg Boss Marathi 4 : स्पर्धक किरण माने घराबाहेर होताच विकासनं बदलला गेम?, प्रोमो रिलीज

Crime News : मुंबईत २० कोटी रुपयांचे कोकेन जप्त, तस्करी करणाऱ्या दोन महिलांना एनसीबीकडून अटक

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version