spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नितीन गडकरींची मोठी घोषणा! रेल्वेप्रमाणे ई-हायवे बनवण्याचा प्लॅन, पुढच्या महिन्यात ई-ट्रक लॉन्च करणार

इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. वायू प्रदूषणाची पातळीदेखील वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांचा इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे कल वाढत आहे. सध्या बाजारात इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. परंतु, आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ अधिक विस्तारणार आहे. अर्थात त्यामागे कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. भारतात इलेक्ट्रिक हायवे अर्थात विद्युत महामार्ग उभारला जाणार आहे. बस, ट्रकसारखी अवजड वाहनंदेखील विजेवर चालवण्याची तयारी आता सरकारने सुरू केली आहे. हे ट्रक आणि बसेस इलेक्ट्रिक वाहनांसारखे असतील; मात्र ही मोठी इलेक्ट्रिक वाहनं महामार्गावर ओव्हरहेड बसवलेल्या इलेक्ट्रिक केबल्सच्या साह्याने चार्ज करता येतील. याबाबीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी माहिती दिली आहे.

हेही वाचा : 

“मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचं” मनसैनिकाची पेडणेकरांवर बोचरी टीका

देशात ई-हायवे बनवण्याचा आमचा प्लॅन आहे. त्यासाठी तुमची मदत हवी असल्याचे गडकरी म्हणाले. रिसर्च करा मी त्याला इन्करेज करतो असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, पुढच्या महिन्यात ई-बसनंतर ई-ट्रक लॉन्च करणार असल्याचेही गडकरी म्हणाले. तसेच मला पेट्रोल डिझेलला हद्दपार करायचं आहे, हा एक अवघड संकल्प असल्याचे गडकरी म्हणाले. मुंबई आयआयटीमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

विद्वान बनणं आणि चांगला व्यक्ती बनणं हे खूप वेगळं आहे. नॉलेजसोबत संस्कार सुद्धा महत्वाचे आहेत. एनर्जी क्रायसेस सगळ्यात मोठी समस्या असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये बोलायची संधी मिळाली त्यावेवी मी त्यांना विचारला की तुमच्या काय समस्या आहेत, ते म्हणाले समाजव्यवस्था बिघडली आहे, कुटुंबपद्धतीत लिव्ह इन रिलेशनशिप पद्धत वाढल्याचं त्यांनी सांगितल्याचे गडकरी म्हणाले.

Maharashtra Politics : अजित पवार नशिकात, तर शिंदे गटाच्या मेळाव्याचे नंदुरबार येथे शक्तिप्रदर्शन

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, `भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश नैसर्गिक भागीदार आहेत. राष्ट्रीय महामार्गांलगत सुमारे तीन कोटी झाडं लावण्यात येणार असून, महामार्गाचं बांधकाम आणि विस्तारीकरणादरम्यान झाडं लावण्याच्या धोरणाचं पालन सरकार करत आहे. आतापर्यंत सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत २७ हजार वृक्षांची एका ठिकाणाहून दुसरीकडे यशस्वीपणे लागवड केली आहे. वृक्षतोड आणि वृक्ष लागवडीसाठी सरकार ट्री बॅंक नावानं नवीन धोरण तयार करत आहे,` असं गडकरी यांनी सांगितलं. या वेळी गडकरी यांनी अमेरिकेतल्या खासगी गुंतवणूकदारांना भारतात लॉजिस्टिक, रोपवे आणि केबल कार क्षेत्रात गुंतवणुकीसाठी आमंत्रित केलं.

Latest Posts

Don't Miss