spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नव्या अध्यायासाठी तयार राहा, नितीश कुमार यांचे आवहान

मुंबई : बिहार मध्ये भाजप आणि जेडीयूचे सरकार कोसळून आता जेडीयू आणि आरजेडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे जवळपास आता निश्चित झालं आहे. काहीच वेळापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. तर, लवकरच ते आरजेडीसोबत मिळून एक नवं सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बिहारमध्ये महारष्ट्रप्रमाणे सत्तांतर होणार हे आता निश्चित झाले आहे.

तेजस्वी यादवांनी नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सकारात्मक आहेत. तर तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळतील. पण, नितीश कुमार यांना गृहखाते तेजस्वीकडे सोपवावे लागणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
“याआधी सन 2017 मध्ये काय झाले ते विसरुन जा आपण आता नवा अध्याय सुरु करुयात,” अशा शब्दांत नितीश कुमार यांनी नेते तेजस्वी यादव यांना साद घालण्याचा प्रयत्न केला. याला तेजस्वी यादव यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असून ते राजभवनाकडे रवाना झाले आहेत.

बिहारमधील भाजपचे भाजपचे प्रमुख संजय जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री, माजी राज्य पक्षाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्या निवासस्थानी भाजपची बैठकही झाली आणि तेथे उपस्थितांमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांचा समावेश होता.जेडीयू बैठकीच्या संभाव्य उपस्थितांपैकी एकापेक्षा जास्त जणांनी हे नाकारले की भाजपसोबतचे पक्षाचे संबंध पुनर्संरेखणाची मागणी करण्याइतपत बिघडले आहेत. एनडीएचा भाग असणाऱ्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि काँग्रेसनेही त्यांच्या बैठका घेतल्या.

हेही वाचा : 

Maharashtra Cabinet expansion : कॅबिनेट मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा

Latest Posts

Don't Miss