spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नव्या राष्ट्रपितांनी भारतासाठी काय केलं? नितीश कुमारांनि दिलाय अमृता फडणवीसांना प्रतिउत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे नवे पिता आहेत, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं होत. या वक्तव्यावर नितीश कुमार यांनी प्रतिउत्तर देत नव्या राष्ट्रपितांनी भारतासाठी काय केलं?, असा सवाल केला आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर यांनी बिहारचे मुख्यमंत्री तसेच संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे नवे पिता आहेत, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं होत. या वक्तव्यावर नितीश कुमार यांनी प्रतिउत्तर देत नव्या राष्ट्रपितांनी भारतासाठी काय केलं?, असा सवाल केला आहे.

अमृता फडणवीसांच्या, ‘जुन्या राष्ट्रपितांना विसरून जा, नवे राष्ट्रपिता आले आहेत’, या वक्तव्यावर नितीश कुमार म्हणाले,”माझे वडील स्वतंत्र लढयात सहभागी झाले होते. माझा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला, परंतु मी स्वातंत्र्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेतली. भारताच्या स्वातंत्र्यात महात्मा गांधींचे योगदान आपण कधीही विसरू शकत नाही. परंतु आता काही लोक राष्ट्रपित्यांविषयी काय बोलत आहेत ते आपण पाहत आहोत. आता हे म्हणत आहेत कि,जुन्या राष्ट्रपितांना विसरून जा, नवे राष्ट्रपिता आले आहेत. नव्या राष्ट्रपित्यांनी भारतासाठी काय केले आहे? त्यांनी काय काम केलाय? त्यांच्या काळात भारत कोणत्या क्षेत्रात पुढे गेलाय?”, असे सवाल करत मोदींवर टीका केली आहे.

या पुढे बोलताना नितीश कुमार म्हणाले,”भाजप आणि संघाने तंत्रज्ञानाचा जबरदस्तीने वापर केला आहे. आधी माध्यमं सरकार असो किंवा विरोधी पक्ष, आपली मत स्पष्टपणे मांडायचे, पण आता त्यांना तेच लिहावं लागत आहे जे सांगितलं जात आहे.भारताच्या स्वातंत्र्याची लढत झाली, मात्र त्या लढाईमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच (RSS) काहीच योगदान नव्हतं”, असे आरोपही नितीश कुमारांनी केले आहेत.

हे ही वाचा:

नव्या वर्षात बसणार महागाईचा फटका वर्षाच्या पहिल्याच दिवशी इतक्या रुपयांनी महागला सिलेंडर

जिंदाल कंपनीत भीषण स्फोटात ३० ते ३५ कर्मचारी अडकल्याची भीती

वर्षाच्या सुरवातीलाच शरद पवार पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर, जाणून घेतल्या समस्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss