spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाकरेंमध्ये थेट हल्ला करण्याची हिंमत नाही ; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टिका

नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर चांगलाच हल्लाबोल केला आहे ते म्हणाले आहेत की, उद्धव ठाकरे हे स्वतःला मर्द म्हणून सांगतात पण ते नपुंसक आहेत. थेट हल्ला करण्यासाठी उद्धव ठाकरे मध्ये ताकत नाही. त्याला अशी भटकी कुत्री लागतात जे येऊन राणेंवर प्रहार करणार, जे भारतीय जनता पार्टीवर हल्ला करणार आणि उद्धव ठाकरे मातोश्री वरून फक्त मज्जा बघणार. उद्धव ठाकरेमध्ये राग नाही, हिमत नाही म्हणून निवडणूक आयोगाने त्याला आयस्क्रिम कोन चिन्ह दिलं आहे. उद्धव ठाकरे आणि त्याच्या मुलाला पाहून आयस्क्रिम कोन चिन्ह आयोगाने दिला आहे.

भास्कर जाधव बोलतात मी शिक्षका चा मुलगा आहे. मला नाही वाटत तो शिक्षकाचा मुलगा आहे, हा एवढा वात्रट निघेल, कार्टा निघेल तर मग याच्या वडीलानी या मुलावर काय संस्कार केले आहेत का ? कि कुठल्या कचऱ्याच्या डब्यातून आणलेलं आहे याला, हे संशोधनाचं विषय आहे. असं म्हणत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव त्यांच्यावर देखील नितेश राणे यांनी टीका केली आहे.

मागील अनेक दिवसांपासून विरोधी पक्षातील नेत्यांची केंद्रीय तपास यंत्रणांमर्फत चौकशी केली जात आहेत. त्यात उद्धव ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची एसीबीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. नाईकांवरील या कारवाईनंतर उद्धव ठाकरे गटातील नेते आक्रमक झाले असून नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळमध्ये मोर्चा काढण्यात आला. याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तथा आमदार नितेश राणे यांनी नाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल आहेत. वैभव नाईक यांच्या विरोधातील पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. तसेच चौकशीला समोरे जायचे. मोर्चा काढून काय होणार आहे, असेही नितेश राणे म्हणाले आहेत.

“वैभव नाईक शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांच्याविरोधात एसीबीची चौकशी का केली जात आहे. वैभव नाईक यांनी चौऱ्या करायच्या, भ्रष्टाचार करायचा, बेहिशोबी मालमत्ता जमा केलेली आहे. तरी देखील नाईक यांच्या बाजूने हे नेते उभे राहात आहेत. २००९ ते २०१९ या काळात बेहिशोबी मालमात्ता का वाढली, हे नाईक यांनी सांगावे. नाईक यांच्यावर जनतेची जबाबदारी आहे. मी स्वच्छ आहे, हे नाईक यांनी सांगायला हवे होते. माझी सर्व संपत्तीचा हिशोब आहे. मी सगळे कर भरतो असे नाईक यांनी सांगायला हवे होते,” असे नितेश राणे म्हणाले.

हे ही वाचा :

लवकरच येणार प्लॅनेट मराठीवर ‘बेबी ऑन बोर्ड’ नवीन सीरिज

बुलढाण्यात भाजपाला मोठा धक्का ! कार्यकर्ते करणार ठाकरे गटात प्रवेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss