बेळगाव बंदीवर धैर्यशील माने संतापले

बेळगाव बंदीवर धैर्यशील माने संतापले

काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद ((Maharashtra Karnataka Border Dispute)) प्रचंड पेटला आहे. तर आज पुहा एकदा महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष आणि शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना बेळगावमध्ये (Belgaum) प्रवेश बंदी करण्यात आली आहे. हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमास येण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून मनाई करण्यात आली आहे. या बंदीमुळे सीमा भागातील मराठी भाषिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तर यावर धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धैर्यशील माने म्हणाले, “एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मला आमंत्रित केले होते. भाषिक तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो म्हणून बेळगावच्या जिल्हाधिकारी यांनी खासदार माने यांना बेळगावमध्ये येण्यास मनाई केली आहे. मागच्या वेळी देखील अशाच पद्धतीचे आदेश निघाले होतो. महाराष्ट्र-कर्नाटक वाद वैचारीक आणि भौगोलिक, असा वाद आहे. भाषेच्या पद्धतीवर आधारीत अशा प्रकारचा वाद आहे. या राष्ट्राला दुभंगता यावी, अशा पद्धतीने पाहणे अत्यंत चुकीचे आहे. कर्नाटक सरकार हूकूमशाही आणि दडपशाही पद्धतीचे राजकारण करत आहे. तसेच सीमावासीयांवर दबाव टाकत आहे,” असे धैर्यशील माने म्हणाले.

बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील (Belgaum Collector Nitesh Patil) याच्या आदेशामुळे सीमा भागातील मराठी भाषिकामध्ये पुन्हा संताप व्यक्त होत आहे. धैर्यशील माने हे महाराष्ट्र सीमा समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत. कर्नाटक-महाराष्ट्र सीमा विवादाबाबत चिथावणीखोर विधान केल्यास भाषेचा प्रश्न निर्माण होईल, अशी माहिती बेळगाव जिल्हाधिकारी यांनी दिली. कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे, असे बेळगाव जिल्हाधिकारी म्हणाले.

Exit mobile version