MPSC विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, उदय सामंतांच स्पष्टीकरण

त्याला एक विशिष्ट दर्जा देऊन जर जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न आत्ताचे सरकार करत असेल तर कोणाला पोट शूळ उठण्याची गरज नाही

MPSC विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, उदय सामंतांच स्पष्टीकरण

कोरोनानंतर जवळपास २ वर्षांनी मोठ्या उत्साहाने दहिहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. याच वर्षी गोविंदांना सुखावून टाकणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून गोविंदांकडून होत असणारी मागणी त्यांनी पूर्ण केली आणि दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला. तसेच या दहीहंडीला खेळाचा दर्जा दिल्यानंतर अनेक ठिकाणी दहीहंडीच्या स्पर्धादेखील भरवण्यात आल्या होत्या.

दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यच्या निर्णयासह गोविंदांना सरकारने गोविंदांना सरकारी नोकरीच्या बाबतीत ५ टक्के आरक्षण देण्याचा देखील निर्णय घेतला होता. पण सरकारच्या या निर्णयाचा विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात येत होता. गोविंदांना आरक्षण देऊन सरकार वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर सरकार अन्याय करत आहे, असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

गोविंदांना आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे शिंदेसरकारवर विरोधकांसह अनेकांनी टीकेची झोड उठवली. यादरम्यान उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी हा निर्णय घेत असताना, निकष ठरविण्यासाठी काम करण्यात येत असल्याचेही म्हटलं आहे. त्याचबरोबर हिंदूंचे सण साजरे करत असताना, त्याला एक विशिष्ट दर्जा देऊन जर जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न आत्ताचे सरकार करत असेल तर कोणाला पोट शूळ उठण्याची गरज नाही असेही म्हटलं आहे. तसेच कदाचित सरकार बदललं, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले हेच अजून काही लोकांना रुचलं नसल्यामुळे ते असा प्रकार घडत आहेत अशी टीका देखील उदय सामंत यांनी केली.

हे ही वाचा:

रत्नागिरीत निलेश राणेंचा ताफा अडवत महिलांनी केला रिफायनरी प्रकल्पाला विरोध

Exit mobile version