निवडणूक कोणतीही असो नियोजन करून आपणच जिंकणार, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

निवडणूक कोणतीही असो नियोजन करून आपणच जिंकणार, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रभर विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, भाजप आणि ठाकरे आणि शिंदे गटाने देखील आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीने निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. अशातच या निवडणुकांसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठे विधान केले आहे आणि त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोणतीही निवडणूक लढवताना योग्य नियोजन असणे अत्यंत गरजेचे आहे. निवडणुकांसाठी नियोजन हे फार महत्त्वाचे आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी असे वक्तव्य केले की त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोणतीही निवडणूक असो पण योग्य नियोजनाच्या जोरावर आम्हीच निवडणूक जिंकणार. मुखमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या या विश्वसामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुढे ते म्हणाले की, मी आज जिथे कार्यक्रमाला जातो, तिथे मला प्रचंड गर्दी, जनसमुदाय पाहायला मिळतो, आम्ही सहा महिन्यांपूर्वी आम्ही राज्यात केलेल्या सत्तपालटाचा हा परिणाम आहे.

तसेच पुढे शेतकऱ्यांच्या प्रश्र्नांबद्दल बोलताना ते म्हणाले की, आमचे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आमच्या ह्या सरकारने अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांना मदत केली आहे. त्यांना दुप्पट नुकसान भरपाई आमच्या सरकारने मिळवून दिली आहे. आमचं सरकार हे सामान्य लोकांच्या मनातील सरकार असल्यामुळे हे सर्व शक्य झाले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. आमच्या सरकारने निकषांच्या पलीकडे जाऊन यावेळी अनेक जनहिताचे निर्णय घेतले आहेत. या सर्व निर्णयांमागे सामान्यांना न्याय मिळावा हाच हेतू होता. लोकांच्या मनात आमच्या सरकारची एक काम करणारं आणि न्याय देणारं सरकार अशी प्रतिमा निर्माण झाली आहे.

हे ही वाचा:

पीएम मोदींवरील बीबीसी डॉक्युमेंट्रीवर सरकारची बंदी, यूट्यूब-ट्विटर ब्लॉक करण्याचे दिले आदेश

ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन, महेश कोठारेंना पितृशोक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version