spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आमच्यात कोणीही फूट पाडू शकत नाही – JITENDRA AWHAD

शंकराचार्य जे बोलले त्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. जातीव्यवस्थेमुळे पिचलेल्या समाजाला डॉ. आंबेडकरांनी न्याय मिळवून दिला. तरीही आज महंत म्हणत असतील की जातीवाद हा नैसर्गिक आहे, असं म्हणतात? या देशाचे संविधान नाकारतायत का शंकराचार्य? याचं स्पष्टीकरण द्यावं. शंकराचार्यांनी बहुजनांची माफी मागावी, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. हे मनुस्मृतीचे समर्थक आहेत, त्यांनी स्वत:ची विष्टा डोक्यावर घेऊन जावी. या धर्तीवरच आम्ही जातनिहाय जणगणनेची मागणी करतो. ही व्यवस्था कुठे चालली आहे? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला.

महाविकास आघाडीची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याबाबत विचारले असता, सुरळीत चर्चा झाली आहे. प्रकाश आंबेडकरांचं स्पष्ट मत आहे की, संविधान वाचवण्यासाठी जे जे करता येईल त्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आमच्यात कोणीही फूट पाडू शकत नाही, आम्ही जागांचं सांगणार नाही, जागावाटप झालं की यादी तुमच्यासमोर येईल, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

Sachin Tendulkar चा व्हिडिओ वायरल, टी शर्ट पाहून गाडी थांबवत घेतली चाहत्यांची भेट

डोंबिवलीमध्ये भररस्त्यात रोड रोमियोकडून महिलेची छेडछाड, रोड रोमियोवर गुन्हा दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss