BJP वर कोणीही विश्वास ठेऊ नये, ते आपल्या जवळच्याच मित्रांचा काटा काढतात, आता ते Ajit Pawar यांचा….संजय राऊतांचा गौप्यस्फोट

BJP वर कोणीही विश्वास ठेऊ नये, ते आपल्या जवळच्याच मित्रांचा काटा काढतात, आता ते Ajit Pawar यांचा….संजय राऊतांचा गौप्यस्फोट

शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत यांनीमहाविकास आघाडी मुंबई-ठाणे विधानसभा सर्वेबाबत भाष्य केले आहे. पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचा कुठलाही अधिकृत सर्वे नाही. निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी 400 पार वाले असे अनेक सर्वे आले होते. सर्वे किंवा त्यासंदर्भातल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. महाराष्ट्रात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्यात कोणत्या भागात काय निकाल लागणार हे आम्हाला माहित असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

काँग्रेसचा मुख्यमंत्री याबाबतची भूमिका मांडताना संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्षाची अशा प्रकारची भूमिका असेल तर त्यांचा हाय कमांड त्यावर निर्णय घेईल. हिसकावून घेऊ असं काँग्रेसचे अधिकृत कार्यकर्ते बोलत असतील तर नाना पटोले (Nana Patole) यांच्या प्रतिमेला डॅमेजिंग आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे, चेहरा ठरविला पाहिजे. काँग्रेस पक्ष असा चेहरा देत असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करू अशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भूमिका आहे. ज्याने त्या संदर्भात अशी वक्तव्य केली जातात त्या नेत्याला ते अडचणीची ठरू शकतात. त्यांच्या समर्थकांनी त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

भाजप (BJP) आणि मिंधे गट एक नंबरचे कारस्थानी आणि कपटी आहेत. निवडणुकीत ते अजित पवार यांचा काटा काढतील आणि निवडणुकीनंतर मिंधे गटाचा काटा काढतील. देशातील अनेक मित्र पक्षांनी याचा अनुभव घेतला आहे. अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यात नेमके गटाचे काही लोक सामील आहेत.
अजित पवार यांना बाहेर काढून आपापल्या वाट्याला जास्त जागा मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. पहिला बळी अजित पवारचा जाणार असेल तर दुसरा बळी मिंधे गटाचा असणार आहे. कुठल्याही परिस्थितीत राज्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे राहू नये यासाठी भाजपमध्ये आता हालचाली सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या लोकांना सांगण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील निवडणुकांचा सर्व खर्च करा. त्यांचे मुख्यमंत्रीपद हे पैशांवर टिकून आहे. हा खर्च केल्यावर मग राज्यावरच्या नेतृत्वावर ठेवायचे की नाही? याचा विचार दिल्ली करणार आहे. मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या नेत्यांना थैल्या द्याव्या लागतात. आज गुजरातच्या व्यापार मंडळाचे राज्य असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

हे ही वाचा:

वरळीत तीन आमदार मात्र झिरो विकास! Shrikant Shinde यांची उबाठावर घणाघाती टीका

Devendra Fadnavis on Koli Bhavan: आपले सरकार कोळी बांधवाच्या बाजूने खंबीरपणे उभे, Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version