spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवीगाळ वगैरे काहीच झालं नाही, तिथे फक्त… ; अब्दुल सत्तारांनी दिलं स्पष्टीकरण

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर पुढील रणनीति ठरवण्यासाठी शिंदे गटाने वर्षा बंगल्यावर महत्वपूर्ण बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्र्यांसमोर राडा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. वर्षा बंगल्यावरील बैठकीत अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्र्यांसमोर शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली होती.अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या खासगी सचिवाला शिविगाळ केल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर सत्तार हे वर्षा बंगल्यावरील बैठकीतून निघून गेले. अशीही माहिती समोर आली. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली होती. पण यावर आता अब्दुल सत्तार यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार बोलताना म्हणाले की, शिवीगाळ वगैरे काहीच झालं नाही, तिथे फक्त चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी चर्चा करायला सांगितल्या. या सर्व बातम्या पाहिल्यानंतर मलाही आश्चर्य वाटलं. आम्ही तिथं फक्त चर्चा केली, सूचना मांडल्या. मी कोणालाही शिवीगाळ केली नाही. मी ४२ वर्षाचा राजकारणी आहे. ते क्लासवन अधिकारी आहेत. मी त्यांना काशी शिवीगाळ करेन असं अब्दुल सत्तार बोलताना म्हणालेत.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आचारसंहितेपूर्वी कामं झाली पाहिजेत नाहीतर आहेत ते पैसे तसेच पडून राहतील ही फक्त माझी मागणी होती. बाकी शिवीगाळ वगैरे काहीच नाही. तिथं मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते तुम्हाला हवं तर तुम्ही त्यांना विचारा असंही सत्तार म्हणालेत. माझ्याआधी २ ते ३ जण निघाले त्यानंतर मी बाहेर पडलो. मी चिडलो नव्हतो असंही अब्दुल सत्तार यांनी म्हंटलं आहे.

Latest Posts

Don't Miss