राज ठाकरेंची नेत्यांना सूचना; ‘या’ चित्रपटाबाबत कुणीही भाष्य करू नये

राज ठाकरेंची नेत्यांना सूचना; ‘या’ चित्रपटाबाबत कुणीही भाष्य करू नये

प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर आणि सुबोध भावे यांचा बहुचर्चित हर हर महादेव चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आल्यानं काल संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या चित्रपटा विरोधात संभाजी राजे छत्रपती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. काल ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये प्रेक्षक हर हर महादेव चित्रपट पाहण्यासाठी आले. पण त्यांना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपट बघू दिला नाही. तर आता हर हर महादेव (Har Har mahadev) चित्रपटाबाबत कुणीही भाष्य करू नये, अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या प्रवक्त्यांना दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या विषयाला जातीय रंग देत असून सध्या आपण या विषयावर बोलू नये, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत.

काल संभाजीराजे छत्रपती यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये हर हर महादेवच्या निर्मात्यांना इतिहासाची मोडतोड केल्याबद्दल फटकारले होते. संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतल्यानंतर आता पिंपरीतील विशाल थिएटरमध्ये हर हर महादेवचा शो बंद पाडण्यात आला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाणे येथील विवियाना मॉलमध्ये चित्रपटाचा शो सुरू असतानाच राडा झाला. या आंदोलनानंतर चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेचा निषेध केला. खरी शिवभक्ती काय असते, ते राज ठाकरे यांच्याकडून शिका, असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाणही करण्यात आल्याचं वृत्त आहे.

त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी चित्रपटाचा शो पुन्हा सुरु केला. त्यामुळे या चित्रपटावरून मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आल्याचं चित्र आहे. आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून या चित्रपटावर भाष्य केलं. राष्ट्रवादीच्या डोक्यातून जात अजिबात जात नाही, अशी टीका देशपांडे यांनी केली. त्यावर राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांना हर हर महादेव चित्रपटाबाबत कुणीही भाष्य करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा :

RRR हा जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा ‘भारतीय चित्रपट’ बनला

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्टीनी घेतली राज्यपालांची भेट, सत्तारांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याच्या मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version