आता नवीन वर्षात ठाकरे विरुद्ध शिंदे सामना

आता नवीन वर्षात ठाकरे विरुद्ध शिंदे सामना

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठा बंड झाला त्यानंतर खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचं यासाठी दोन्ही गटामध्ये मोठा वाद दिसून येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central Election Commission) आजपासून शिंदे गट (Thackeray Group) आणि ठाकरे गट (Shinde Group ) यांच्यामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाचं, यासह अन्य मुद्द्यांवर सुनावणी झाली. मात्र आजची सुनावणी काही मिनिटेच चालली. तर यासंदर्भातील पुढील सुनावणी ही नवीन वर्षात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचं, केंद्रीय निवडणूक आयोगाने Central Election Commission सांगितल्याचं ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते अनिल देसाई (Anil Desai) यांनी सांगितलं आहे.

ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल देसाई (Anil Desai) म्हणाले आहेत की, धनुष्यबाण चिन्हासह इतर मुद्द्यावर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार. या मुद्द्यांवर आज युक्तिवाद होऊ शकला नाही. ते म्हणाले, आज फक्त ५ ते ७ मिनिटेच कामकाज झालं. आम्हाला अपेक्षित होत की, आम्ही ज्या गोष्टी सादर केल्या आहेत. जे मूळ दस्तावेज दिले आहेत, त्या दस्तावेजाची छाननी झाली पाहिजे होती. त्यात खरं काय, खोटं काय, हे दोन्ही बाजूचे तपासायला हवं होतं. त्यानंतर ते निवडणूक आयोगासमोर जाणार. परंतु जानेवारीच्या पहिल्या आठवड्याची तारीख दिल्याने आम्ही तयार आहोत, असं ते म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले, आमच्याकडे ३ लाख प्रतिज्ञापत्र पात्र आणि इतर प्राथमिक सदस्यांची नोंद आम्ही दिली आहे. यातच आतापर्यंत या दोन्ही गटाकडून काय दवे करण्यात आले आहे, हे जाणून घेऊ.

दरम्यान, निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीपुरता ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (Uddhav Balasaheb Thackeray) असं नाव मान्य केलं होतं. तसेच मशाल हे चिन्ह दिलं होतं. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi shivsena) पक्ष असं नाव मान्य करत ढाल-तलवार हे चिन्ह तात्पुरता स्वरुपात दिलं होतं. आता निवडणूक आयोगाने दिलेले हेच नाव आणि चिन्हं कायम राहतील का की ठाकरे गटाला दिलासा मिळतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा : 

जी २० परिषदेच्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई जोरदार तयारी सुरु

मोदींनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी दिले प्रत्युत्तर

ट्विटर यूजर्ससाठी लॉन्च करणार लॉन्च ब्ल्यू टिक सब्सक्रिप्शन पॅकेज

Follow Us

Exit mobile version