spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आता अजित दादांच्या जागी Jay Ajit Pawar निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. त्याचसोबत प्रत्येक वर्गाला आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठीचे हे सर्व उपक्रम आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार गटातील पक्षातंर्गत हालचालींना वेग आला आहे. अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. जनसन्मान यात्रेत अजित पवारांच्या (Ajit Pawar) गुलाबी जॅकेटपासून ते त्यांचा लोकांमधील मोकळाढाकळा वावर अशा अनेक गोष्टींची चर्चा सुरु आहे. नुकतीच त्यांनी बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध माझ्या पत्नीला रिंगणात उतरवण्याचा निर्णय चुकीचा होता, अशी कबुली दिली होती. अजितदादांच्या या कबुलीवरुन सुरु झालेली चर्चा थांबत नाही तोच आता त्यांनी बारामतीच्या राजकारणासंदर्भात आणखी एक सूचक वक्तव्य करुन राजकीय वर्तुळाची उत्कंठा वाढवली आहे.

विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्याऐवजी त्यांचे पुत्र जय पवार (Jay Pawar) रिंगणात उतरतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत अजित पवार यांनी गुरुवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केले. बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार निवडणूक लढवणार आहेत का, असा प्रश्न अजितदादांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, शेवटी आपल्याकडे लोकशाही आहे. मला रस नाही. मी सात-आठ निवडणुका केल्यात. त्यांच्यासंदर्भात (जय पवार) जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संसदीय मंडळ निर्णय घेतली. जनता, कार्यकर्ते आणि पार्लामेंटरी बोर्ड जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. अजित पवार यांनी जय पवार बारामतीमधून लढण्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळलेली नाही. अन्यथा अजितदादा एरवी रोखठोक उत्तर देऊन मोकळे होतात. पण अजितदादांनी बारामती विधानसभेचा निर्णय जनतेवर सोडून भविष्यातील वेगळ्या राजकारणाचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्री आणि माझ्यात वाद नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण :

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत एका फाईलवर सही करण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात वाद झाल्याची  माहिती समोर आली होती. याबाबत अजित पवार यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, या बातम्या धादांत खोट्या आहेत. आमच्यात कुठलाही वाद आणि मतभेद नाहीत. आम्ही सगळे एकोप्याने सरकार चालवत आहोत. मी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही सगळे जळगावला एकत्र जाऊन आलो. विरोधकांकडे सध्या टीकेसाठी कोणताही मुद्दा उरलेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असेल तर आम्ही त्यावर काही करु शकत नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.

हे ही वाचा:

१५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या दिवसांची सुट्टी आता होणार आनंददायी; Central Railway चालवणार १८ विशेष रेल्वे गाड्या!

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss