Saturday, July 6, 2024

Latest Posts

आता शेतकऱ्याची आर्थिक विवंचना होणार दूर; Bacchu Kadu यांनी दिला ‘हा’ निर्णय

अमरावती (AMRAVATI) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोबत असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी आता एक रुपया भरावा लागणार नाही. त्याचप्रमाणे त्यांनी असेही संगितले की लवकरात लवकर ते अमरावती जिल्ह्यतील कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकांना योग्यतो हमीभाव मिळावा यासाठी ते संपूर्ण प्रयत्न करतील...

भारत म्हटल तर शेतीप्रधानता आपल्याला विशेषतः लक्षात येते. भारत हा शेतीप्रधान देश आहे. ज्यामुळे येथे आपल्याला हिरवे हिरवेगार गालिचे आठवतात. प्रधानमंत्री पीक विमा योजना (PM Fasal Bima Yojana) ही भारतात लागू झाली आहे. एक देश एक योजना या संकल्पनेवर ही पीक विमा योजना आधारित आहे. या योजनेची सुरुवात ही राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्यापासून झाली होती नंतर काँग्रेसने (Congress) यात थोडे बदल केले. सुरुवातीला ही योजना ठराविक पिकांसाठीच होती नंतर यात बदल करण्यात आले. त्यांनतर केंद्र सरकारने १३ जानेवारी २०१६ रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजनेला केंद्र कडून मंजूरी देण्यात आली. ही मंजुरी एक देश एक योजना या अंतर्गत मिळाली होती.

या योजनेच्या अनुषंगाने अमरावती (Amravati News) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयांतर्गत शेतकऱ्यांना आता शून्य टक्के व्याजदरात पिक कर्ज भरता येणार आहे. दरवर्षी राज्य सरकार पीक कर्जावरील व्याजाची ६% रक्कम बँकेत जमा करत होते. मात्र, आता अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे ३१ मार्च पर्यंत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दाराने पीक कर्ज परत करता येणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिली आहे.

“महाराष्ट्रामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकाकडून सहा टक्के व्याजमाफी न देता पूर्ण सहा टक्के धरून कर्ज वसूल करण्यात येत होते. परंतु आता या निर्णयामुळे ६% जे केंद्र आणि राज्य सरकार माफ करते होते ते व्याज वसूल न करता मार्च महिन्यापर्यंत जे कर्ज पूर्ण भरतील त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मध्यवर्ती बँकेच्या खात्यावर रक्कम जमा करावी, या अटीशर्तीवर शून्य दरात सध्या कर्ज वसुली करण्यात येत आहे.या पद्धतीची ही महाराष्ट्रातील पहिली बँक असल्याने या निर्णयाचा फायदा जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांना होणार आहे.” असे बच्चू कडू यांनी सांगितले. या अधिक व्याज दरामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत  आहेत. अशा आत्महत्या थांबवण्यासाठी सरकार शुन्यव्याजदरात शेतकऱ्यांना कर देणार आहे. ज्यामुळे शेतकरी आत्महत्या करणे काहीप्रमाणात थांबवितील.

त्याचप्रमाणे यंदा सरकारने बरेच असे निर्णय घेतले आहेत ज्यात शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. “सरकार हे शासन नियमानुसार बँकेत रक्कम जमा करेल तेव्हा करेल, मात्र आम्ही त्यापूर्वी हा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलास दिला आहे. हल्ली या प्रक्रियेमुळे चार ते पाच महिन्यात ती रक्कम जमा होते. आम्ही त्याचा विचार न करता शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेत आहोत. हे सहा टक्के शेतकऱ्यांच्याच बचत खात्यात जमा होणार आहेत. पूर्वी ज्या पद्धतीने कार्यपद्धती चालत होती त्याच पद्धतीने चालावी, अशी आमची आग्रही मागणी होती.उद्या चालून सरकारने काहीही निर्णय घेतला तरी शेतकऱ्यांना कर्ज भरणे हे अधिक सुलभ व्हावं यासाठी आम्ही हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.” असे आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) म्हणाले.

या निर्णयामुळे ५० ते ५५ हजार लोकांना याचा फायदा होणार आहे आणि  उर्वरित २२ ते २३ कोटी रुपये इतकी कर्जवसुली आहे ती ६% व्याजदरात नंतर शेतकऱ्यांकडून वसुल करता येणार आहेत. हा असा निर्णय इतर सरकारी बँकांनी सुद्धा घ्यायला हवा ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल.अशी मागणी देखील बच्चू कडू यांनी केली आहे. या निर्णयामुळे  अमरावती (AMRAVATI) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोबत असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी आता एक रुपया भरावा लागणार नाही. त्याचप्रमाणे त्यांनी असेही संगितले की लवकरात लवकर ते अमरावती जिल्ह्यतील कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकांना योग्यतो हमीभाव मिळावा यासाठी ते संपूर्ण प्रयत्न करतील. ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर सुगीचे दिवस येतील.

हे ही वाचा

NTA कृत UGC-NET परीक्षा रद्द ; केंद्रसरकारच्या शिक्षण मंत्रालयाने दिल स्पष्टीकरण ..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss