आता महाराष्ट्रात तिसरी आघाडी ? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल हे घडत आहेत. रोज वेगवेगळ्या कारणांनी राजकीय वातावरण हे तापलेलं दिसून येत आहे. सध्या राजकारणात आणखी एक खळबल उडालाय आहे ती म्हणजे माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या एका पोस्ट केली आहे.

आता महाराष्ट्रात तिसरी आघाडी ? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल हे घडत आहेत. रोज वेगवेगळ्या कारणांनी राजकीय वातावरण हे तापलेलं दिसून येत आहे. सध्या राजकारणात आणखी एक खळबल उडालाय आहे ती म्हणजे माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या एका पोस्ट केली आहे. आणि सध्या हि पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. माजी खासदार छत्रपती संभाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज आहेत. माजी खासदार छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी गुरुवारी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव Telangana CM K Chandrasekhar Rao) यांची प्रगती भवन येथे भेट घेतली. यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. तसेच आता महाराष्ट्र तिसरी आघाडी होणार का असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.

माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची प्रगती भवन येथे भेट घेतली. विकासाच्या मुद्द्यांव्यतिरिक्त, सीएम केसीआर आणि संभाजीराजे यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर प्रदीर्घ चर्चा केली, असे सूत्रांनी सांगितले. संभाजी राजे, जे एक स्वतंत्र राजकारणी आहेत, त्यांनी एससी/एसटी, बीसी आणि अल्पसंख्याकांसाठी राज्याच्या कल्याणकारी योजना आणि तेलंगणा सरकारने त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी अवलंबलेल्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. ते म्हणाले की, तेलंगण मॉडेल आणि कल्याणकारी योजना महाराष्ट्रात तसेच उर्वरित देशात लागू कराव्यात.

त्यांच्या या योजना व कार्यपद्धती याविषयी प्रदीर्घ चर्चा झाली. श्री राव हे केवळ आपल्या राज्यापुरते मर्यादित न राहता इतर राज्यांच्या विकासाचा व त्यामाध्यमातून संपूर्ण राष्ट्राचा विकास साधण्याचा दूरगामी दृष्टिकोन ठेवणारे अत्यंत ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी आपल्या निवासस्थानी अगदी आपुलकीने आदरातिथ्य केले. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांना पूर्ण अभ्यास असून महाराजांविषयी त्यांच्या मनात अत्यंत आदरभाव जाणवला. यावेळी श्री राव यांना राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचा चरित्रग्रंथ भेट दिला.

हे ही वाचा:

Pathaan Housefull, शाहरुख खानचा पठाण काश्मिरमध्ये करतोय जादू

दुबई-जयपूर फ्लाईटला उशीर, प्रवाशाला एक ट्विट पडलं महागात

दादरची आग तर विझली परंतु राजकारण तापलं, कालिदास कोळंबकर म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version