spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आता प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया योजनेंतर्गत, १४ हजार ५०० शाळा होणार अपग्रेड

केंद्र सरकारनं आता देशातील शाळांमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्याचा संकल्प केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी शिक्षक दिनानिमित्त "प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया" (PM SHRI Yojana) योजनेची घोषणा केली.

केंद्र सरकारनं आता देशातील शाळांमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्याचा संकल्प केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी शिक्षक दिनानिमित्त “प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया” (PM SHRI Yojana) योजनेची घोषणा केली. याअंतर्गत देशभरात १४,५०० शाळा विकसित आणि श्रेणीसुधारित केल्या जातील. शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः एक ट्विट केले आहे आणि त्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रयोगशाळा, ज्यामध्ये १४,५०० अनुकरणीय शाळा त्यांच्या अनुभवात्मक, सर्वांगीण, चौकशीवर आधारित आणि विद्यार्थ्यांवर आधारीत असलेल्या अध्यापनशास्त्रासह मानवतावादी दृष्टिकोन असलेल्या चांगल्या व्यक्ती तयार केल्या जातील. पुढे बोलताना प्रधान म्हणाले की, ‘पंतप्रधान-श्री शाळा या क्षेत्रातील इतर शाळांमध्ये अभ्यासाचं वातावरण निर्माण करण्यासाठी आणि शैक्षणिक निकाल सुधारण्यासाठी प्रयत्न करतील.’

पंतप्रधान मोदींनी सोमवारी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी संवाद साधला. यादरम्यान पंतप्रधान म्हणाले की, आपल्याला केवळ विद्यार्थ्यांना शिकवायचं नाही तर त्यांचं जीवनही बदलायचं आहे. भारत आपली शैक्षणिक परिसंस्था मजबूत करण्यासाठी योग्य दिशेनं वाटचाल करत आहे.

पंतप्रधान मोदी बोलताना म्हणाले की, “PM-श्री हा शाळांमध्ये शिक्षण देण्याचा आधुनिक, परिवर्तनशील आणि सर्वांगीण मार्ग असेल. अद्ययावत तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरूम, खेळ आणि बरंच काही यांसह आधुनिक पायाभूत सुविधांवर देखील लक्ष केंद्रित केलं जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं अलिकडच्या वर्षांत शिक्षण क्षेत्राचा कायापालट केला आहे. मला खात्री आहे की, PM-श्री शाळेचा NEP च्या माध्यमातून भारत भरातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा होईल.” पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज शिक्षक दिनी मला एका नवीन उपक्रमाची घोषणा करताना आनंद होत आहे. ‘प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया (PM-SHRI) योजनेंतर्गत, संपूर्ण भारतात १४,५०० शाळा विकसित आणि श्रेणीसुधारित केल्या जातील. या शाळा आदर्श बनतील ज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा (NEP) संपूर्ण आत्मा अंतर्भूत होईल.

अद्ययावत तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरूम, क्रीडा आणि आधुनिक पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करून शाळांमध्ये शिक्षण देण्याचा PM-श्री हा एक आधुनिक, परिवर्तन घडवणारा आणि सर्वांगीण मार्ग असेल, असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी तीन ट्वीट करत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.

हे ही वाचा:

सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार

आशिकी 3, सत्यप्रेम की कथा, शहजादा: भूल भुलैया 2 च्या यशानंतर कार्तिक आर्यनचे आगामी चित्रपट

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss