spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बारामतीत शरद पवारांना धक्का, सोमेश्वर कॉलेजला पवारांचे नाव दिल्याने शेतकरी कृती समितीचा आक्षेप

पुण्याच्या बारामतीमधील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कॉलेजला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव दिल्याने सतीश काकडे यांनी आक्षेप घेतला आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजला शरद पवारांचे नाव दिल्याने शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी आक्षेप घेतला आहे. शरद पवारांचे दिलेलं नाव काढावे अशी मागणी सतिश काकडे यांनी केली आहे.

हेही वाचा : 

ST कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता मिळणार? शिंदेंनी बोलावली कामगारांची बैठक; ‘हे’ निर्णय होण्याची शक्यता

कारखान्याच्या संचालक मंडळाने सभासदांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप सतीश काकडे यांनी केला आहे. संचालक मंडळाने नामांतराचा विषय कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडायला हवा होता. परंतु संचालक मंडळाने जनरल बॉडीत निर्णय २०१९ साली घेतला आणि हे शेतकऱ्यांना मागच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर २०२२ मध्ये कळलं असं सतीश काकडे यांचं म्हणणं आहे. पवार कुटुंबियांचा कारखान्याशी काहीही संबंध नसताना त्यांचं नाव का द्यायचं, असा सवाल काकडे यांनी केला आहे.

याकारणांमुळे शरद पवारांचे कॉलेजला दिलेले नाव काढावे, अशी मागणी काकडे यांनी केली. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. वेळप्रसंगी मंत्रिमंडळात हा विषय नेणार आहे. जर कुठेही न्याय मिळाला नाही, दिलेले नाव काढले नाहीतर नाईलाजाने उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, असे त्यांनी सांगितले. तसेच आम्हाला न्यायालयात न्याय मिळेल, असा विश्वास देखील सतीश काकडे यांनी व्यक्त केला.

शिंदे पुत्र Vs ठाकरे पुत्र! आता सामना रंगणार वारसदारांमध्ये; मतदारसंघ एक तर सभा दोन

शरद पवारांच्या प्रकृती बाबत माहिती

काल गुरुवारी शरद पवार यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती, असे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांकडून समोर येत होते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे त्यांना आणखी काही दिवस हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात येणार आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पोटदुखीच्या त्रासामुळं त्यांना मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशयात खडे तयार झाल्याने त्यांच्या पोटात दुखत असल्याचे निदान झाले होते. नंतर एन्डोस्कोपीद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आले होते.

Kartiki Ekadashi : अमृता फडणवीसांनी घातली फुगडी तर देवेंद्र फडणवीसही टाळाच्या तालावर थिरकले!

Latest Posts

Don't Miss