जुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी आर्थिक ताळेबंद पाहून निर्णय घेणार – देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आर्थिक ताळेबंद पाहून पेन्शनचा (Pension) निर्णय घेणार असल्याची माहिती आज विधान परिषदेत दिली आहे

जुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी आर्थिक ताळेबंद पाहून निर्णय घेणार – देवेंद्र फडणवीस

जुनी पेन्शन योजना सुरु करावी यासाठी राज्यातील विविध कर्मचारी संघटना मागील अनेक दिवसांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अशातच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात जुनी पेन्शन बाबत चर्चा करण्यात अली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आर्थिक ताळेबंद पाहून पेन्शनचा (Pension) निर्णय घेणार असल्याची माहिती आज विधान परिषदेत दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर जुन्या पेन्शनच्या योजनेसाठी (old pension scheme) बैठक घेणार असल्याच फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. जुन्या पेन्शन योजनेसाठी आम्ही नकारात्मक नसून २००५ नंतर जॉईन झालेल्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती अद्याप जवळ आली नाहीये असं वक्तव्य देखील फडणवीसांनी केलंय.

नागपूरला झालेल्या हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार नसल्याचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. 2005 मध्ये पेन्शन योजना (Maharashtra Old Pension Scheme) बंद झाली आहे. राज्याच्या आर्थिक तिजोरीवर येणार भर लक्षात घेऊन लक्षात घेऊन जुनी पेन्शन योजना रद्द करण्यात आली आहे. या पेन्शन योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर एक लाख १० हजार कोटींचा बोझा पडेल. असं फडणवीस म्हणाले होते. आता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक असून, याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आज विधानपरिषदेत बोलताना फडणवीस यांनी आम्ही जुन्या पेन्शन योजनेसाठी नकारात्मक नसल्याचं म्हटलं आहे.

हे ही वाचा :

निवडून येताच नवनिर्वाचीत आमदार अश्विनी जगताप यांची कमला सुरुवात , पक्षाचा आदेश येताच अधिवेशनात सामील होणार

Share Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी, अदानी समूहाचे शेअर्स देखील सुसाट

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version