ओमराजे निंबाळकरांनी पुन्हा एकदा राणा जगजितसिंह पाटलांना डिवचलं

ओमराजे निंबाळकरांनी पुन्हा एकदा राणा जगजितसिंह पाटलांना डिवचलं

कालपासून ओमराजे निंबाळकर आणि राणा जगतसिंह पाटील यांच्यात मोठा वाद दिसून येत आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी ( ३ नोव्हेंबर ) झालेली पीक विम्याची बैठक चांगलीच गाजली. या बैठकीत शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात खडाजंगी झाली. जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या समक्ष हा प्रकार घडल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील जुने वाद पुन्हा उफाळून आले.

शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण समितीचा बैठक असावी, असे वाटून ओमराजे निंबाळकर आले होते. त्यावेळी ओमराजे निंबाळकर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बोलत होते. तेव्हा राणा जगतजितसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांना ‘बाळ आहेस तू’ असं म्हटलं. यावर ओमराजे निंबाळकर संतापले. ‘मला बाळ म्हणू नको, तू तूझ्या औकातीत राहा, तुमचे संस्कार, तुमची औकात मला सगळं माहिती आहे. जास्त बोलू नको, तुला मी बोललेलो नाही, तुझं बोलायचं कारण नाही,’ असं म्हणत खडसावलं होतं.

ओमराजे निंबाळकरांनी पुन्हा आता फेसबुक पोस्ट करत राणा जगजितसिंह पाटील यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. “जिथे मी चुकत नाही तिथे मी झुकत नाही,” म्हणत ओमराजे निंबाळकर म्हणाले, “कलेक्टर कचेरीत संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असताना त्या आमदाराने त्याच्या नेहमीच्या पद्धतीने विषयाला फाटा द्यावा म्हणून वैयक्तिक मला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. ‘सोन्याचा चमचा’ घेऊन व आजूबाजू चमचे मंडळी ठेऊन त्यांना सर्वांवर रुबाब करायची सवय आहे. परंतु, त्यांचा सामना या ‘पवनराजे’ साहेबांच्या मुलाशी झाला आणि आगीशी का खेळू नये हे आता त्याला नक्कीच कळले असेल.”

समोरच्याला कळेल या भाषेत समजाविले इथून पुढेही गरज पडेल तेव्हा लोकांसाठी कोणालाही कधीही भिडायला आम्ही तयार आहोत. फक्त यांची समोरासमोर करायची नव्हे, तर गुपचूप पाठीमागे करायची सवय आहे. हे ही मी आणि राज्यातील जनता जाणून आहे,” असेही ओमराजे निंबाळकरांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

हे ही वाचा : 

अनन्या पांडेच्या वांद्रेतील पोस्टवर सुहाना खानने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

सिद्धू मूसवालाच्या हत्येवर दिलजीत दोसांझने दिली प्रतिक्रिया म्हणाला “हे सरकारचे अपयश आहे”

जालन्यात एकनाथ शिंदेंच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version