Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह भाषेतील टीकेवर, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह भाषेतील टीकेवर, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रीया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून सत्तारांनी माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. मात्र, सत्तारांच्या टीकेनंतर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सुळे म्हणाल्या, ‘मी यावर भाष्य करणार नाही’ असं त्यांनी म्हटलं आहे.

अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलताना एका शिवीचा वापर केल्या होता, यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना या टीकेवर बोलण्यास नकार दिला आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर मी काहीही बोलणार नाही असे म्हटले आहे. या संपुर्ण प्रकरणावर मी बोलणार नाही, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान सत्तार यांच्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीकडून जोरदार निषेध व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : 

राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांची माफी; ‘स्वारी म्हणतो, शब्द मागे घेतो’

औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. दरम्यान याचवेळी माध्यमांशी बोलताना विरोधकांवर सत्तार यांनी टीका केली. आम्हाला खोके म्हणणारे लोक भि**** असल्याचं सत्तार म्हणाले. तर सुप्रिया सुळे यांचा देखील सत्तार यांनी असाच उल्लेख केला. विशेष म्हणजे एकदा नाही तर दोनवेळा सत्तार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यामुळे आता राज्यभरातून त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे. तर सत्तार यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी केली जात आहे.

अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. परंतु आपण त्या वक्तव्यावर ठाम असल्याचं आणि तोच शब्द वापरणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. ‘मी जी भाषा वापरली त्यावर मी ठाम आहे, माझी जर कोणी बदनामी करत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल’ असं अब्दुल सत्तार म्हणाले. अब्दुल सत्तार हे खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, की, काही लोकांच्या डोक्यामध्ये खोके आहेत. ज्याच्या ज्याच्या तोंडामध्ये खोके येतात त्यांचं डोकं तपासावं लागेल. काही लोकांना रात्री स्वप्नातही खोकी दिसतात.

अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर खालच्या भाषेत टीका; राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक

Exit mobile version