Chhagan Bhujbal यांच्या राजीनाम्यावर मनोज जरांगे म्हणाले, दुसरा विदूषक…

मनोज जरांगे पाटील यांनीही छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Chhagan Bhujbal यांच्या राजीनाम्यावर मनोज जरांगे म्हणाले, दुसरा विदूषक…

Chhagan Bhujbal  : सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. अश्यातच चर्चा आहे ती म्हणजे लोकसभा आणि राज्य सभा या निवडणुकांची. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. तर काहींनी पक्षाची साथ सोडत नवीन पक्षात एन्ट्री देखील केली आहे. परंतु सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी काल रात्री समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते व राज्यातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal) यांनी एक मोठा गौप्यस्फोट हा केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ यांनी १६ नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. नगर येथील ओबीसी एल्गार परिषदेत स्वत: छगन भुजबळ यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. भुजबळ यांच्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच भुजबळ यांच्या राजीनाम्यावर अनेक तर्कवितर्कही व्यक्त केले जात आहे. राजकीय वर्तुळातूनही भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनीही छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनीही भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलत असताना मनोज जरांगे म्हणाले आहेत की, दुसरा विदुषक बाहेर निघाला. ते म्हणजे ओबीसी बांधव आणि सरकारला सुद्धा कलंक आहेत, असं सांगतानाच आमची विजयी सभा मोजायला ये, असं आव्हानच मनोज जरांगे पाटील यांनी केलं. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर बोलण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन बाळगलंय. छगन भुजबळांनी जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला होता असं विधान केलं होतं.. त्यावर अजितदादांनी प्रतिक्रीया देणं टाळलंय.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version