Tuesday, July 2, 2024

Latest Posts

राहुल गांधींच्या ‘हिंदुत्वा’बाबतच्या विधानावर उद्धव ठाकरे म्हणाले…

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी अग्निवीर योजना, हिंदुत्व आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर आरोप केले.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी अग्निवीर योजना, हिंदुत्व आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर आरोप केले. जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात आणि २४ तास हिंसा आणि द्वेष पसरवतात, ते हिंदू नाहीत, असे वक्तव्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी यांच्या भाजपवरील या आरोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेप घेतला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभे राहून त्यांना उत्तरं दिले तर अमित शहा देखील भडकल्याचे चित्र दिसत होते. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्या पैकी कुणी हिंदुत्वाचा अपमान करणार नाही आणि कुणी सहन देखील करणार नाही. राहुल गांधी म्हणाले ते योग्यच आहे. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही… हे मी याआधीही म्हणालो आहे. मी भाजपला सोडलेलं आहे. हिंदुत्व सोडलेलं नाही. इथून पुढेही हिंदुत्व सोडणं शक्य नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. राहुल गांधी यांनी हिंदुत्वाचा अपमान केला नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, असं राहुल गांधींनी ठासून सांगितलं आहे. पण भाजपच्या लोकांनी राहुल गांधींवर हिंदुत्वाचा अपमान केल्याचा ठपका ठेवला आहे. पण त्यांनी हिंदुत्वाचा अपमान केलेलाच नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. राहुल गांधी काल बोलताना जय संविधान म्हणाले. त्यांच्या ‘जय संविधान’ म्हणण्याने काहींना मिर्च्या झोंबल्यात. ज्यांना ‘जय संविधान’ मिर्च्या झोंबल्यात त्यांच्या निषेधाचा ठराव दोन्ही सभागृहात मांडावा आणि तो लोकसभेत पाठवावा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

नेमकं काय घडलं?

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी भगवान शंकराचा फोटो घेऊन संसदेत दाखल झाले. त्यांनी भगवान शंकराचा फोटो हातात घेऊन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. मी या फोटोच्या माध्यमातून काही सांगू इच्छितो. शिवशंकर यांच्यापासून कधीही निर्भय राहण्याची शक्ती मिळते. भगवान शंकाराकडून आपल्याला सत्यापासून कधीही मागे हटू नये, अशी प्रेरणा मिळते. भगवान शंकराच्या डाव्या हातातील त्रिशूळ हे अहिंसाचं प्रतीक आहे. हे त्रिशूळ जेव्हा उजव्या हातात असतं तेव्हा ते हिंसाचं प्रतीक असतं. सत्य, धाडस आणि अहिंसा हेच आमचं संबळ आहे, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी सभागृहात गुरुनानक यांचा फोटो दाखवत राहुल गांधी यांनी भूमिका मांडली. “शिवशंकर म्हणतात, घाबरु नका आणि घाबरवू नका. जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात आणि २४ तास हिंसा आणि द्वेष पसरवतात, ते हिंदू नाहीत”, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्या भाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्षेप घेतला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे योग्य नाही, असे पंतप्रधान म्हणाले. तर, गृहमंत्री अमित शाह यांनी जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते हिंसा करतात. त्यांना माहित नाही की करोडो लोक अभिमानाने स्वतःला हिंदू म्हणवतात. ते सगळे हिंसाचार करतात का? राहुल गांधी यांनी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

हे ही वाचा:

‘तुमच्या खुर्चीवर दोन लोक बसलेत…’ Rahul Gandhi यांची लोकसभा अध्यक्ष Om Birla यांच्यावर टीका

राहुल गांधींनी संसदेत भगवान शिवाचा फोटो का दाखवला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss