शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ‘सामना’तून शिंदे गटावर जोरदार टीका

आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ‘सामना’तून शिंदे गटावर जोरदार टीका

आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. आज सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? अशी चर्चा रंगलेली असतानाच मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून या तैलचित्र अनावरण सोहळ्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. त्याच बरोबर शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे.

आमचे नाते मोदींशी आहे असं सांगणारे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव का घेत आहेत? विधानसभेत बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्याचं ढोंग रचलंय ते कशासाठी? एक तर तैलचित्रात निष्ठेच्या तेजाचा अंश नाही. ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेच्या बाबतीत बेईमानी केली, त्याच विधानसभेत तैलचित्र लावून महाराष्ट्रापुढे कोणतं चित्रं रंगवत आहात? असा सवाल आज दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

सध्या आपल्या महाराष्ट्रात एक भलतेच राजकारण सुरू झाले आहे.राज्यात शिवसेना प्रमुखांची चोरी करण्याचा विषय सुरू आहे. या चोरीमारीस देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हातभार लावत आहेत, याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्राला हे ढोंग मान्य नाही. गेल्या पाच महिन्यात राज्यात ढोंगबाजीने कहर केला. शिवसेनेचे मुखवटे लावून काही मंबाजी सत्तेत घुसले. त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला, असा हल्लाही करण्यात आला आहे. भाजपने एक पेंढा भरवलेला कोल्हा खुर्चीवर बसवलेला आहे. त्या कोल्ह्याला काडीची किंमत नाही. लाचारी आणि गुलामीची हद्द पार करत त्यांनी आम्ही मोदींची माणसं आहोत, असं जाहीर केलं. त्यामुळे शिवसेना खतम करण्याचे किती मोठे कारस्थान भाजप आणि त्यांच्या हस्तकांनी केलं हे कळलंच असेल, असा दावाही करण्यात आला आहे.

तसेच अग्रलेखात पुढे म्हणण्यात आले आहे की, बाळासाहेब ठाकरे हे पुण्यवान अमर आत्मा आहेत. त्यांचे चित्रं लोकांच्या हृदयावर कोरले गेले असून ते प्रामाणिक आहे. स्वाभिमानाचा कुंचला आणि निष्ठेच्या रंगाने हे चित्र अमर झाले आहे. विधानसभेत बाळासाहेबांचे तैलचित्र लावणे हे एक ढोंग आहे. त्या तैलचित्रात निष्ठेचा आत्मा आणि तेज नसल्याने ४० बेईमानांच्या ढोंगाशिवाय या सोहळ्यात दुसरे काहीच दिसत नाही, असा हल्लाही अग्रलेखातून चढवण्यात आला आहे.

मंबाजीचे मुख्यमंत्रीपद औटघटकेचे आहे. तसेच उद्याचे भविष्य शिवसेनेचे आहे. मंबाजीने बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा केला. पण आपला बाप आणि पाठिराखा दुसराच कोणी असल्याचा दावा परदेशात केला. त्यामुळे शिवसेनेचा बाप कोण? हा प्रश्नच निकाली निघाला आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी गंगेच्या प्रवाहातील ओंडके आपोआपच दूर झाले आणि काशीच्या हरिश्चंद्र घाटावर पोहोचले. त्या घाटावर हरामखोरांची राजकीय चिता पेटे हीच बाळासाहेबांना आदरांजली असल्याचंही अग्रलेखातून म्हटलं आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, “शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी एक निर्धार प्रत्येकाने केलाच पाहिजे, तो म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या नावे सुरू झालेला ढोंगाचा बाजार कायमचा गाडण्याचा व संपवण्याचा. शिवसेनेच्या नावावर उतलेले-मातलेले मंबाजी, त्या मंबाजी मंडळाचे ‘खोके’ राजकारण, त्या राजकारणातून सुरू असलेली महाराष्ट्राची बदनामी, त्या बदनामीतून खचलेल्या मराठी मनास उभारी देण्याचे काम शिवसेनेला करावे लागेल. मंबाजीने बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगितला, पण मोदींसमोर गुडघे टेकून सांगितले, ‘‘आम्ही शिवसैनिक होतो हे ढोंग होते. त्यामुळे साहेब आम्ही तुमचेच!’’ अशी कबुलीच दिल्याने शिवसेनेचा बाप कोण? हा प्रश्नच निकाली लागला. बाळासाहेबांच्या जन्मदिनी गंगेच्या प्रवाहातील ओंडके आपोआप दूर झाले व काशीच्या हरिश्चंद्र घाटावर पोहोचले. त्या घाटावर हरा*** राजकीय चिता पेटेल. हीच बाळासाहेबांना त्यांच्या जन्मदिनी आदरांजली असेल”, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

हे ही वाचा:

बाळासाहेबांच्या जयंती निमित्त मनसेकडून केला खास व्हिडिओ शेअर

आज होणार ठाकरे गट आणि वंचितच्या युतीची घोषणा, ‘या’ ठिकाणी करणार युतीची घोषणा

आजोबांची जयंती आदित्य ठाकरे विसरले, केली मोठी चूक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version