गांधी जयंतीनिमित्त पीएम मोदींसह सोनिया गांधींही पोहचल्या राजघाटावर, बड्या नेत्यांकडून राष्ट्रपिता यांना भावपूर्ण श्रद्धांजली

गांधी जयंतीनिमित्त पीएम मोदींसह सोनिया गांधींही पोहचल्या राजघाटावर, बड्या नेत्यांकडून राष्ट्रपिता यांना भावपूर्ण श्रद्धांजली

गांधी जयंतीनिमित्त राज्यसह देशभरात कार्यक्रमांचे आयोजन करून बापूंचे स्मरण केले जात आहे. बापूंना अभिवादन करण्यासाठी राजघाटावर नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी राज घाटावर बापूंना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींना त्यांच्या १५३व्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी पंतप्रधानांनी लोकांना खादी आणि हस्तकला उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले. २ ऑक्टोबर हा दिवस देशभरात गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला.

गांधी जयंतीनिमित्त पीएम मोदींनी ट्विट केले की, गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधींना विनम्र अभिवादन. ही गांधी जयंती आणखी विशेष आहे कारण भारत स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. सदैव बापूंच्या आदर्शावर जगा. गांधीजींना श्रद्धांजली म्हणून मी तुम्हा सर्वांना खादी आणि हस्तकला उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन करतो.”

उपवासाठी खास ३ प्रकारचे पदार्थ; जाणून घ्या रेसिपी…

सोनिया गांधी यांनीही श्रद्धांजली वाहिली

बापूंच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हेही रविवारी सकाळी राजघाटावर पोहोचले. समाधीस्थळी पुष्प अर्पण करून त्यांनी बापूंचे स्मरण केले. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लिहिले की, “बापूंनी आम्हाला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालायला शिकवले. प्रेम, करुणा, सौहार्द आणि मानवता याचा अर्थ समजावून सांगितला. आज गांधी जयंतीच्या दिवशी आपण प्रतिज्ञा घेतो, ज्याप्रमाणे त्यांनी देशाला अन्यायाविरुद्ध एकत्र केले, त्याचप्रमाणे आता आपणही आपला भारत एक करू.

राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली

गांधी जयंतीनिमित्त केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केले की, “मी पूज्य बापूंना त्यांच्या जयंतीनिमित्त नमन करतो. गांधीजींनी देशाला दिलेला ग्रामविकास आणि स्वावलंबनाचा विचार स्वातंत्र्याच्या अमृतात एका नव्या युगात दाखल झाला आहे. त्यांचे विचार आणि आदर्श देशवासीयांना नेहमीच प्रेरणा देत राहतील.

Constipation : बद्धकोष्ठता दूर होण्यासाठी घरगुती उपाय

Pune Chandani Bridge : अखेर चांदणी चौकातील पुल जमीनदोस्त पण, वाहतूक अजूनही बंदच

Exit mobile version