spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जयंत पाटील यांच्या चिरंजीवाचा विवाहनिमित्त, आज शिंदे-फडणवीस आणि ठाकरे आमनेसामने येणार का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांचा लग्नसोहळा आज (२७ नोव्हेंबर) सांगलीतील इस्लामपूरमध्ये राजारामबापू साखर कारखान्याच्या राजारामनगर या परिसरात पार पडणार आहे. या लग्नाची चर्चा सध्या राज्यभर सुरु आहे. दोन लाख लग्नपत्रिका, भला मोठा शामियाना, गावातील रस्तेदेखील चकाचक करण्यात आले आहेत. प्रतीक पाटील यांच्या शाही लग्नासाठी इस्लामपुरात जय्यत तयारी करण्यात येत आहे. सोबतच या लग्नात राज्यातल्या नेतेमंडळीची देखील मांदियाळी बघायला मिळणार आहे. पण सर्वात जास्त उत्सुकता आहे ती म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री शिंदे (EKnath shinde) उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnvis ) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) या लग्नसोहळ्या निमित्त आमनेसामने येणार का?

हेही वाचा : 

मनसेची आज मुंबईतील नेस्को ग्राउंडवर सभा होणार, राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?

(Jayant Patil’s son Prateek Patil’s wedding ceremony) या विवाह सोहळ्यात वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, कपिल पाटील, भागवत कराड, आदित्य ठाकरे, विधानसभआ अध्यक्ष राहुल नार्वेकर, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह राज्याती मंत्री, आमदार आणि खासदारांसह अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

या शाही विवाहाच्या सुमारे दोन लाख पत्रिकांचं वाटप करण्यात आलं आहे. त्यात तीन प्रकारच्या पत्रिकेचा समावेश आहे. मान्यवरांसाठी एक, नातेवाईकांसाठी आणि मतदारसंघातील जनतेला देण्यासाठी एक अशा तीन प्रकारच्या पत्रिका वाटण्यात आल्या आहेत. त्यामुळे लग्नात मोठ्या संख्येने लोक येणार असल्याची माहिती आहे.

गांधींच्या हत्येमागे काँग्रेस, रणजित सावरकरांचा काँग्रेसवर थेट आरोप

जयंत पाटील यांना दोन मुले असून थोरला मुलगा राजवर्धन तर धाकटा मुलगा प्रतीक आहे. राजवर्धन याचे लग्न झाले आहे तर प्रतीक याचा आज विवाह सोहळा संपन्न होणार आहे. प्रतीक पाटील यांनी २०१४ पासून वाळवा इस्लामपूर मतदार संघात राजकीय कारकीर्द सुरू केली आहे. प्रतीक यांनी आपले परदेशात लंडन येथे इजिनीअरिंगमध्ये एमएस केले आहे. सध्या ते मतदारसंघात लक्ष्य देत आहेत. अनेक सामाजिक आणि राजकिय क्षेत्रात भरीव काम करत त्यांनी कामातून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. तर सांगलीतील किर्लोस्करवाडी येथील किर्लोस्कर ब्रदर्सचे सर्वेसर्वा उद्योगपती राहुल किर्लोस्कर याची सुकन्या अलिका यांनीही बिझनेस क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलं आहे. त्या सध्या किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करत आहेत.

Yoga in winter हिवाळयात ‘ही ‘ योगासने करा, हाडांचे दुखणे होईल दूर

Latest Posts

Don't Miss