spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानासंदर्भात प्रबोधन करण्याची वेळ आली, जयंत पाटील

भारताच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न जेवढा महत्त्वाचा आहे. तेवढेच या देशातील सर्वसामान्य माणसांचे अधिकार देखील महत्त्वाचे आहे.

भारताच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न जेवढा महत्त्वाचा आहे. तेवढेच या देशातील सर्वसामान्य माणसांचे अधिकार देखील महत्त्वाचे आहे. आज भारतामध्ये सर्वसामान्य माणसांचे अधिकार ज्या उद्दिष्टाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जन्माला घातलेल्या अधिकारांवर मर्यादा येत आहे असा एक साधारणपणाने समज या देशातील जनतेचा गेल्या काही वर्षात होत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात देशाचा प्रजासत्ताक दिन प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते झेंडा फडकवून साजरा करण्यात आला.

जयंत पाटील म्हणाले की, या देशांमध्ये व्यक्ती स्वातंत्र टिकलं पाहिजेत या देशात प्रत्येक माणसांना ज्या पद्धतीने जगायचं हे त्याचा तो हक्क आहे. त्यासाठीच प्रजासत्ताक दिनाने आपल्याला काय दिलं आहे याची उजळणी होणं देखील आवश्यक आहे. आज देशामध्ये संविधान बचावाचा नारा सर्व जण देत आहे. हे संविधान तुम्हा आम्हा सगळ्यांना या देशाची घटना दिली. संविधानाच्या माध्यमातून इतके वर्ष या देशात काम करत आलो आहे. त्यामध्ये कधीही कोणी गदा आणली नाही. कुणावरही वागण्यावर आणि बोलण्यावर मर्यादा आल्या नाही पण अलीकडच्या काळामध्ये या देशांमध्ये सर्वांनाच मर्यादा या लागल्या आहे. त्याचबरोबर न्याय व्यवस्था आणि प्रशासकीय व्यवस्था यांच्या अधिकाऱ्याची मर्यादा अधिक गडद व्हायला लागली आहे. न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याला न्याय मिळणार की नाही याची सामान्य माणसांना चिंता वाटत आहे असे जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील म्हणाले की, धर्मनिरपेक्षता या देशाच्या विविधतेला संरक्षण देणारी बाब होती. आज या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात सर्वांना प्रगतीचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेला आहे. व्यक्तीच्या प्रगतीमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. म्हणून व्यक्ती स्वातंत्रतेचा आपल्या संविधानामध्ये मोठा भाग आहे. व्यक्तीचे स्वातंत्र्य त्याच्या प्रगतीला प्रोत्साहन देणारा असलं पाहिजे असा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेळेपासून झाला. आज मात्र त्या सर्वांच्यावर हा देश सर्वधर्म भाव हा पाडणारा होऊ शकत नाही तो शब्दच घटनेतून आणि संविधानातून काढण्यात आला असल्याने हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी चिंतेची बाब आहे असेही जयंत पाटील म्हटले आहे.

पुढे जयंत पाटील म्हणाले की, २६ जानेवारी निमित्त संविधान बचाव हा नारा हळूहळू बुलंद होत आहे. लोकांना काळजी वाटू लागली आहे. २६ जानेवारीच्या दिवशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपलं संविधान टिकलं पाहिजे वाचलं पाहिजे त्यात बदल आपल्या जनतेने सहन केले नाही पाहिजेत. या दृष्टीने आपण सर्वांनी जनतेपर्यंत पोहोचून सामान्य माणसांना संविधान आणि संविधानाने दिलेले जे अधिकार आहे. त्याची जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन सांगितले पाहिजे. जनतेला पुन्हा एकदा ७५ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त संविधानासंदर्भात प्रबोधन करण्याची वेळ आली आहे असे जयंत पाटील म्हटले. जयंत पाटील म्हणाले की ,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी आयुष्यभर ही भूमिका स्वीकारली पाळली त्याचा पालक पोषण विचारांचा करण्याचा प्रयत्न केला. त्या विचारांच्या मागे तुम्ही सर्वजण आहात. पवार यांनी या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलेलं ते संविधानाचा आदर ठेवून या देशाच्या सगळ्या शेवटच्या माणसाला संरक्षण देण्याची भूमिका आहे ती केव्हाही शरद पवार यांनी क्षणभरही ढवळी दिली नाही. त्या भूमिकेशी आपण सर्वजण एकरूप होऊन काम करणार असा विश्वास यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

प्रजासत्ताक दिनानिमित्त विजय वडेट्टीवार यांनी दिला इशारा,

मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss