spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पहिल्याच दिवशी NEET पेपर फुटीवरून संसदेत ताणतणाव, परीक्षा पद्धतीला बकवास म्हटल्याबद्दल धर्मेंद्र प्रधान राहुल गांधींवर संतापले, नेमकं काय झालं?

आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. यावेळी संसदेत विरोधी पक्षच्या नेत्यांनी नीट पेपर फुटीवरून संसदेत प्रश्न उपस्थित केला आहे.

Budget Session of Parliament : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. तर उद्या संसदेत अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन विक्रमी सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी आज दिनांक २२ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत. आजपासून सुरू झालेले संसदेचे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये एकूण १९ बैठका होणार आहेत. २०२३-२४ चे आर्थिक सर्वेक्षण लोकसभेत दुपारी १ वाजता आणि राज्यसभेत दुपारी २ वाजता सादर केले जाईल. दुपारी ०२.३० वाजता महापालिकेत पत्रकार परिषद होणार आहे. आगामी अर्थसंकल्प ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची मे महिन्यात तिसरी टर्म मिळाल्यानंतरची पहिली मोठी धोरणात्मक घोषणा असेल. देशातील बेरोजगारी आणि इतर विद्यमान समस्यांना तोंड देण्यासाठी अर्थसंकल्पात अनेक उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाच्या कालावधीत सरकार ६ विधेयके मांडण्याची शक्यता आहे. तर आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस असून सभागृहात मात्र तणावाचे वातावरण दिसून आले आहे.

आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. यावेळी संसदेत विरोधी पक्षच्या नेत्यांनी नीट पेपर फुटीवरून संसदेत प्रश्न उपस्थित केला आहे. परीक्षा पद्धतीला बकवास म्हटल्याबद्दल धर्मेंद्र प्रधान राहुल गांधींवर संतापले असल्याचं दिसून आलं आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी विरोधकांनी गदारोळ केला तर यासंदर्भात उत्तर देताना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, ‘गेल्या सात वर्षांत पेपरफुटीबाबत कोणताही पुरावा नाही. हे प्रकरण आधीच सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. यावर सरन्यायाधीश सुनावणी करत आहेत. NTA नंतर २४० परीक्षा झाल्या आहेत. ५ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आणि ४. ५ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला.

 

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, ‘संपूर्ण देशाला हे स्पष्ट झाले आहे की आपल्या परीक्षा पद्धतीत खूप गंभीर समस्या आहे. फक्त NEET मध्येच नाही तर सर्व प्रमुख परीक्षांमध्ये काहीतरी गडबड आहे. मंत्री (धर्मेंद्र प्रधान) यांनी स्वतः सोडून सगळ्यांना दोष दिला आहे. मला असे वाटत नाही की त्याला येथे काय चालले आहे याची मूलभूत तत्त्वे देखील समजतात. पुढे राहुल गांधी म्हणाले, ‘मुद्दा असा आहे की देशात लाखो विद्यार्थी आहेत जे घडत आहे त्याबद्दल अत्यंत चिंतित आहेत आणि त्यांना खात्री आहे की भारतीय परीक्षा प्रणाली फसवी आहे. लाखो लोकांचा असा विश्वास आहे की जर तुम्ही श्रीमंत असाल आणि तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही भारतीय परीक्षा पद्धती विकत घेऊ शकता आणि विरोधी पक्षही असाच विचार करतात. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रश्नावर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. पुढे शिक्षण मंत्री म्हणाले आहेत की, २०१० मध्ये जेव्हा दूरस्थपणे सरकार चालवणाऱ्यांनी शिक्षण सुधारणांबाबत विधेयके आणली होती, पण कायदा बनवता आला नाही.

हे ही वाचा:

Mumbai उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून ‘इतक्या’ कोटींची तरतूद – Mangal Prabhat Lodha

Balasaheb Thackeray यांच्या पाठीत खंजीर खुपसला, हे आम्हाला नकली बोलणार?: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss