spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एक देश , एक निवडणूक मोदींचा नवा नारा

सध्याची राजकीय परिस्तिथी पाहता मोदी सरकार विरुद्ध इतर पक्ष अशी स्थिती दिसत आहे. मोदी सरकारला पाडण्यासाठी सगळ्याच पक्षाकडून अतोनात प्रयत्न सुरु आहेत. त्यातच मोदी सरकारकडून एक घोषणा करण्यात आली होती. मोदी सरकारने अचानक संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे.

सध्याची राजकीय परिस्तिथी पाहता मोदी सरकार विरुद्ध इतर पक्ष अशी स्थिती दिसत आहे. मोदी सरकारला पाडण्यासाठी सगळ्याच पक्षाकडून अतोनात प्रयत्न सुरु आहेत. त्यातच मोदी सरकारकडून एक घोषणा करण्यात आली होती. मोदी सरकारने अचानक संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. यानंतर देशात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (एक देश, एक निवडणूक) यावर एका समितीचंही गठण करण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी काळात लोकसभेसह सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही होणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

तसेच मोदी सरकार ‘इंडिया’ आघाडीच्या ताकदीला घाबरल्याने त्यांनी एक देश, एक निवडणुकीचा प्रकार आणला आहे, असा आरोप केला. संजय राऊत यांनी पत्रकार परीशब्द घेत या संदर्भात वाच्यता केली आहे. मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते. संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काल ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा (एक देश, एक निवडणूक) एक नवा फुगा हवेत सोडला आहे. त्याआधी एक निशाण, एक संविधान असंही म्हटलं गेलं. जम्मू-काश्मीरमध्ये काय घडलं? मोदी सरकारने आधी वन नेशन, वन इलेक्शन अंतर्गत तिथं निवडणूक घ्यावी. मणिपूरमध्येही निवडणूक घ्यावी. आमची बैठक होऊच शकणार नाही. असा ज्यांना वाटत होतं त्यांना आता चांगलीच चपराक बसली आहे. एकूण २८ पक्ष एकत्र आल्यानंतर मोदी सरकार घाबरले असणार असे संजय राऊत म्हणाले आहे. आणि म्हणूनच अचानकपणे संसदेचं डीएशन हे भरवला आहे असे देखील संजय राऊत म्हणाले.

देशात वन नेशन, वन इलेक्शनऐवजी फेअर इलेक्शन (निष्पक्ष निवडणूक) घ्यायला हवी. भ्रष्ट निवडणूक आयोग या देशात काम करत आहे. तो भ्रष्ट निवडणूक आयोग दूर केला पाहिजे. दबावाखाली काम करणारा भ्रष्ट आयोग जोपर्यंत आहे तोपर्यंत देशात निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाही. त्यामुळे एक देश, एक निवडणूक हा राजकीय फंडा आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.मोदी सरकार इंडिया आघाडीच्या ताकदीला घाबरलं आहे. त्यामुळे माथेफिरुपणातून एक देश, एक निवडणूक हा प्रकार सुचला आहे,” अशी टीकाही राऊतांनी केली.

हे ही वाचा:

इंडिया आघाडीचे फोटोसेशन सुरु ,कोण उभे आहेत कोणत्या रांगेत…

मंत्रालयावर सुरू झाला दगडांचा वर्षाव… नेमके काय घडले …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss