मुंबईमधील शंभर टक्के रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, एकनाथ शिंदेंनी दिले आश्वासन

शोधूनही रस्त्यावर खड्डा सापडणार नाही आणि यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे

मुंबईमधील शंभर टक्के रस्ते  सिमेंट काँक्रिटचे होणार, एकनाथ शिंदेंनी दिले आश्वासन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दरवर्षी न चुकता मुंबईच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम केले जाते. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्ह्णून कितीतरी टेंडर पास करून मुंबईच्या रस्त्यांची दडूजी केली जाते. पण, जून जुलै महिन्यात एकदा का पावसाची सुरुवात झाली कि मग मुंबईच्या रस्त्यांची चाळण झाल्याशिवाय राहत नाही. ठिकठिकाणी पडलेल्या या खड्ड्यांमुळे कित्येकदातरी लहान मोठे अपघात होत असतात. तसेच अनेकदा या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.

मुंबई आणि उपनगरात अजूनही ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. मुंबई एमएमआरडीएच्या अखत्यारित येणारे पश्चिम, पूर्व द्रुतगती महामार्ग, बीकेसी, तसंच मुंबई महापालिकेच्या अंतर्गत रस्त्यांवरही खड्डेच खड्डे पाहायला मिळतायत… खड्डे भरण्यासाठी एमएमआरडीए आणि मुंबई महापालिकेनं प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र कंत्राटदारांची नियुक्ती केलीय.. लाखोंची कंत्राटं दिली तरी देखील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पाहायला मिळतायत.. त्यामुळे मृत्युचे सापळे ठरणाऱ्या खड्ड्यांसाठी जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.

रस्त्यांवरून आणि या खड्ड्यांवरून सतत उपस्थित करण्यात येणाऱ्या या प्रश्नांची अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री विधानसभेत बोलत होते. या खड्ड्यांच्या प्रश्नाबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “दरवर्षी मुंबईत डांबरीकरण करून खड्डे बुजवले जातात मात्र आता काँक्रिटीकरणाचा प्रकल्प आता राबवण्यात येणार आहे. दरवर्षी १०० ते १५० किलोमीटरच्या रस्त्यांचे कॉक्रीटीकरणकेले जाते. पण आता ६०३ किलोमीटरच्या रस्त्यांचे टेंडर मंजूर झाले आहे आणि आता येत्या मार्चमध्ये उरलेल्या ४२३ काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. येत्या दीड ते दोन वर्षात हे काम पूर्ण केले जाईल”. तसेच “मुंबईकरांना शोधूनही रस्त्यावर खड्डा सापडणार नाही आणि यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

शिंदे – फडणवीस सरकारच्या 12 नावांची यादी राज्यपाल करणार का मंजूर?

२५ हजार कोटींच्या मागण्या पूर्ण पण, शेतकऱ्यांसाठी दमडी नाही, काँग्रेस आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version