‘पोटात एक आणि ओठात एक…’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाणे येथे त्यांना अभिवादन केले.

‘पोटात एक आणि ओठात एक…’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाणे येथे त्यांना अभिवादन केले. एकनाथ शिंदे यांनी राज्याचा कारभार सांभाळल्यानंतर आज आनंद दिघे यांची प्रथमच पुण्यतिथी होती. मुख्यमंत्री स्वतः तेथे उपस्थित होते. यावेळी त्यांनी आम्ही आनंद दिघे यांच्या विचारांनी चाललो असल्याचं सांगत शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करणार असल्याचं सूतोवाच पुन्हा एकदा त्यांनी केलं.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिघे यांच्याबद्दलचे किस्से सांगितले. “त्यांनी मला जेव्हा ठाणे महापालिकेचे सभागृह नेता केलं तेव्हा ते बाहेरून विचारपूस करत मी काम कसं करतो आहे त्याबद्दल विचारायचे. एकनाथ कसं काम करतोय असं ते विचारायचे. आपला शिष्य कशा प्रकारे जबाबदारी पार पाडतोय याची ते माहिती घ्यायचे.” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आजही त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन आम्ही राज्याच्या विकासाचं काम पार पाडणार आहोत असं ते म्हणाले. “आपल्या पोटात एक आणि ओठात एक असं कधी आम्ही केलं नाही, बाळासाहेबांचा आणि दिघेसाहेबांचा आशिर्वाद आमच्या पाठीमागे आहेच. जनतेसाठी चांगलं काम करणे हीच खरी दिघेसाहेबांसाठी श्रद्धांजली असेल” असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

 

हे ही वाचा :-

नितेश राणे स्वतःच्या बापाचे ऐकत नाही – किशोरी पेडणेकर

मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी, किरीट सोमय्या यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version