वन नेशन वन इलेक्शन म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव – जयंत पाटील

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चधिकार समितीने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ बाबत अहवाल सादर केला. हा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने स्विकारला आहे.

वन नेशन वन इलेक्शन म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव – जयंत पाटील

Jayant Patil on Ramnath Kovind : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चधिकार समितीने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ बाबत अहवाल सादर केला. हा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने स्विकारला आहे. देशव्यापी चर्चेनंतर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ धोरण लागू केलं जाऊ शकतं. याला विरोधी पक्षांचा कडाडून विरोध आहे. काँग्रेसने या धोरणाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. तर महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटानेही ‘वन नेशन, वन इलेक्शन’ धोरणाला विरोध केला आहे. अश्यातच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

आपल्या देशात संघराज्य पद्धत आहे मात्र देशात वन नेशन वन इलेक्शन आणून अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणे हा भाजपचा डाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली लोकशाही चौकट समूळ नष्ट करण्याचे पहिले पाऊल आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

काल केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शन या निवडणूक प्रक्रियेला मंजुरी दिली. याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. याबाबत सविस्तार बोलताना ते म्हणाले की, देशाची घटना बदलण्याच्या मनसुब्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता. आता पुन्हा घटना बदलण्याचा प्रकार भाजप समोर आणत आहे अशी टीका त्यांनी केली. भारतीय जनता पक्षाने नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टाळलेल्या आहेत. ते वन नेशन वन इलेक्शनची भाषा बोलतात हे आश्चर्यकारक आहे. मागे लोकसभा निवडणुकीत सात टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्यात आली. त्यातही गोंधळ झाला अशा परिस्थितीत वन नेशन वन इलेक्शन करणे शक्य आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Gold Silver Rate Today : पितृपक्षातील या’ तिथीला सोने आणि चांदी खरेदी करणे मानले जाते शुभ त्याबद्दल माहिती आहे का तुम्हांला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version