पंकजा मुंडे यांनी पक्षावर केला आरोप

राजकारणामध्ये अनेक नवीन उलथापालथ होताना बघायला मिळत आहे. आणि त्यात आता पुन्हा नवीन चर्चाना उधाण आले आहे.

पंकजा मुंडे यांनी पक्षावर केला आरोप

राजकारणामध्ये अनेक नवीन उलथापालथ होताना बघायला मिळत आहे. आणि त्यात आता पुन्हा नवीन चर्चाना उधाण आले आहे. आतच काही तासापूर्वी ठाकते गटाला मोठा धक्का मिळालं आहे. नीलम गोर्हे यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकूनत्यांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे त्यामुळे ठाकरे गटाची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यातच आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र आज पंकजा मुंडेंनी आज प्रसार माध्यमानापुढे येऊन या संदर्भात खुलासा केला आहे. पंकजा मुंडे यांनी माझ्या बाबतीतल्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं सांगत पाठीत खंजीर खुपसण्याचं माझं रक्त नाही, असं विधान केलं आहे.

त्यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये त्यांनी नेमका कोणावर रोष दाखवला आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पंकजा मुंडें रोख कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.भाजपच्या १०६ आमदारांच्या मनात काही गोष्टी असतील पण बोलण्याची हिम्मत नाही. माझ्या पक्षाला माझ्याबद्दल सन्मान असेल अशी माझी अपेक्षा आहे, जनतेला लपून छपून काम करणाऱ्यांचा कंटाळा आला आहे” असं म्हणत पंकजा मुंडेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधल्याचं स्पष्ट होत आहे. पंकजा मुंडे बोलतांना म्हणाल्या की, सध्याचं जे राजकारण सुरु आहे त्याचा वीट आला आहे. राजकारणातून एक्झिट घ्यायला मी मागेपुढे पाहणार नाही. त्यामुळे मी एक-दोन महिने सुट्टी घेणार असून अंतर्मुख होऊन विचार करणार आहे. पाठीत खंजीर खुपसण्याच माझं रक्त नाही, २०१९ मध्ये माझा पराभव झाला तेव्हापासून मी पक्ष सोडेल अशा चर्चा सुरु होत्या. चार वर्षांपासून त्या सुरुच आहेत. परंतु त्यात काहीही तथ्य नाही.

तसेच पंकजा मुंडे म्हणाल्या की, भागवत कराडांना राज्यसभा, रमेश कराडांना विधान परिषद मिळाली. त्यानंतरही अनेक विधान परिषद झाल्या. त्यामुळे माझे कार्यकर्ते माझ्या नावाची चर्चा करता. माझे अर्थ लावले जातात, अर्थ समर्पकही बसतात. परंतु पुढे काही होत नाही. याबद्दल पक्षाने उत्तर द्यायला हवं. असं देखील त्या म्हणाल्या . दोन वेळा मला सांगितलं विधान परिषदेसाठी अर्ज भरा आणि दहा मिनिटं आधी सांगितलं की, अर्ज भरु नका, हे कोण करतंय माहिती नाही.पंकजा मुंडे यांनी माझ्या संदभात काही बाटल्या चुकीच्या दाखवल्या गेले त्यापैकी, मी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची बातमी चुकीची आहे हि माहिती पसरवण्यात आली परंतु यामधले काहीच घडले नाही असा त्या म्हणाल्या. एखाद्याची क्रेडिबिलिटी आणि करिअर संपवण्याचा हा प्रकार आहे, माझं करिअर कवडीमोलाचं नाही, २० वर्षांपासून मी राजकारणात काम करत आहे. मला डावललं जातं, पंकजा मुंडे पात्र असतील नसतील, यावर पक्षाने उत्तर द्यायला पाहिजे असा देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी हि वारंवार समोर येत आहे.

हे ही वाचा:

ठाकरे गटाचा आणखी एक शिलेदार कमी

अमोल कोल्हे यांनी शिवाजी अढळराव पाटील यांच्याबाबत केला मोठा खुलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version