Thursday, July 4, 2024

Latest Posts

पंकजा मुंडे यांना भाजपकडून पुनर्वसन, लोकसभेतील पराभवानंतर मिळाले तिकीट

राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी (Maharashtra Vidhan Parishad Election 2024) भाजपकडून ५ नावांची घोषणा करण्यात आली आहे.

राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी (Maharashtra Vidhan Parishad Election 2024) भाजपकडून ५ नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. पंकजा मुंडे यांनी बीडमधून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्या पराभूत झाल्या होत्या. मुंडे यांच्यानंतर भाजपने योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली आहे.

यंदा महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. निकालही त्याच दिवशी जाहीर होणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने ११ नावांची यादी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली होती. आगामी विधानसभा निवडणुका आणि राजकीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवून भाजप पक्षाच्या दिग्गजांनी यापैकी ५नावांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पंकजा मुंडे अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा सभागृहात दिसणार आहेत. पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेची उमेदवारी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जात आहे.

भारतीय जनता पक्षात पंकजा मुंडे दीर्घकाळापासून राजकीय सत्तेच्या वर्तुळाबाहेर होत्या. गेल्या पाच वर्षांपासून त्या सक्रीय राजकारणातून बाहेर होत्या. २०१९ मध्ये विधानसभेची उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यानंतर त्यांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली होती. या यात्रेच्या माध्यमातून पक्षात आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. परंतु त्यानंतर त्यांना पक्षाकडून लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली नव्हती. आता त्यांना नुकतीच लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. परंतु बजरंग सोनवणे यांनी त्यांना पराभूत केले होते. बीडमधून लोकसभेच्या निवडणुकीत ६००० मतांच्या थोड्या फरकाने पराभूत झाल्या. त्यामुळे दिल्लीचे उघडलेली दार त्यांचे बंद झाले.

राज्य विधानसभेतील त्यांच्या संख्येच्या आधारे, या निवडणुकांमध्ये भाजपला सात जागांचा कोटा आहे. महाविकास आघाडीला (एमव्हीए) सुमारे तीन जागांचा कोटा आहे. यावेळी प्रत्येक MLC जागेसाठी सरासरी २३ कोटा आवश्यक आहे. सामान्यतः असे मानले जाते की मराठा आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा आणि मराठवाडा विभागातील अनेक मतदारसंघांमध्ये आंदोलनामुळे इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि मराठा समाज यांच्यात जातीय रेषांवर मोठे ध्रुवीकरण झाले. दानवे यांचा लोकसभा निवडणुकीतही पराभव झाला होता.

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या ११ जागा २७ जुलै रोजी रिक्त होत आहेत. या जागा विधानसभा सदस्यांमधून भरल्या जाणार असून सध्याचं संख्याबळ पाहता भाजपच्या ५, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनचे २, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी होऊ शकतात.

भाजपकडून विधानपरिषदेसाठी कुणाला संधी?
  • पंकजा मुंडे
  • योगेश टिळेकर
  • परिणय फुके
  • अमित गोरखे
  • सदाभाऊ खोत

हे ही वाचा:

Mumbai Graduate Constituency : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

जितेंद्र आव्हाड यांनी केला मोठा आरोप, वर्ल्ड कपच्या नावाखाली…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss